अत्यंत चुरशीच्या झालेल्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत एकीकडे बंडखोरीमुळे युती करूनही शिवसेना भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. तर दुसरीकडे एमआयएमने अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकत या निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केली. औरंगाबादमध्ये युतीची सत्ता येणार हे जरी निश्चित असले तरी त्यासाठी त्यांना आता बंडखोरांची आणि अपक्षांची गरज पडणार आहे, हे देखील स्पष्ट आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या गुलमंडी वॉर्डातून त्यांचे उमेदवार आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. महायुतीला ५१ जागांवर यश मिळाले असून, एमआयएमला स्वबळावर २५ जागा जिंकण्यात यश मिळाले आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या ११३ प्रभांगासाठी बुधवारी ६२ टक्के मतदान झाले होते. प्रचाराच्या केंद्रस्थानी धार्मिक मुद्दे राहिलेली औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील लढाईमुळे प्रचंड लक्षवेधी ठरली होती. निवडणुकीत शिवसेना सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असला तरी शिवसेनेच्या दोन माजी महापौर कला ओझा आणि अनिता घोडेले यांना पराभवाचा झटका सहन करावा लागला आहे.
मुस्लिमबहुल भागांमध्ये एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचबरोबर एमआयएमने उमेदवारी दिलेले पाच दलित उमेदवारही निवडणुकीत यशस्वी ठरले आहेत.
अंतिम पक्षीय बलाबल
शिवसेना – २९
भाजप – २२
एमआयएम – २५
कॉंग्रेस – १०
राष्ट्रवादी – ३
बसप – ५
रिपब्लिकन पक्ष – १
अपक्ष – १८
औरंगाबादमध्ये महायुतीला बहुमताची हुलकावणी, एमआयएमची मुसंडी
शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील लढाईमुळे औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक प्रचंड लक्षवेधी ठरली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-04-2015 at 10:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad mahanagar palika election result