जीवन रटाळ आहे. अभ्यास, नोकरी, लग्न-संसार, मुले-बाळे आणि निवृत्तीनंतर मृत्यू येईपर्यंत वाट पाहायची, असा संदेश लिहून औषध निर्माण शास्त्राच्या विद्यार्थ्याने आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षेपूर्वीच आत्महत्या केल्याची घटना हडको परिसरात घडली. अशी माहिती टिव्ही सेंटर पोलीस चौकीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक शेषराव इलोग यांनी दिली.

या विद्यार्थ्याची आजपासून औषध निर्माण शास्त्राची परीक्षा सुरू होणार होती. तो एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचे वडील परदेशात नोकरीस आहेत. घटना घडली तेव्हा आई व बहीण देखील घरामध्ये होत्या. पहाटे ४ वाजेच्या सुमारास आई झोपेतून उठली तेव्हा त्यांना मुलाच्या खोलीचे दार खुले दिसले. आत पाहिले असता त्यांच्या मुलाने गळफास घेतला होता.

“जीवन रटाळ आहे. २२-२४ वर्षांपर्यंत शिक्षण, नंतर नोकरी, लग्न, मुले-बाळे व निवृत्तीनंतर मृत्यू येण्याची प्रतीक्षा… अशा रटाळ जीवनात काहीही अर्थ नाही.”, असा संदेश त्याने लिहून ठेवला होता. याप्रकरणाची सिडको पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.