सातारा : नववर्षाच्या स्वागतासाठी पाचगणी, महाबळेश्वर पर्यटनस्थळे सज्ज झाली आहेत. या दोन्हीही स्थळांवरची सर्व हॉटेलसह पर्यटक निवासस्थानांची आगाऊ नोंदणी पूर्ण झाली असून, त्यांच्याकडून नववर्ष स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी संगीतासह पर्यटकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान, नववर्षाचे स्वागत करतेवेळी अनैतिक कृत्य, अमली पदार्थांचा वापर, ध्वनिप्रदूषण आदीबाबत पोलिसांकडून सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दोन्ही पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते, तसेच परिसरात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आलेली आहे. पोलिसांसह उत्पादन शुल्क आणि वन विभागाचीदेखील या परिसरात करडी नजर असणार आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार आणि कोयना पाटण ही पर्यटन स्थळे गजबजून गेली आहेत. महाबळेश्वरच्या विविध पॉइंटवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. नववर्षाचे स्वागत करतेवेळी अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामध्ये अनेकदा अनैतिक कृत्य, अमली पदार्थांचा वापर केला जातो. संगीत -गाण्यांचा कार्यक्रम करताना ध्वनिक्षेपक लावत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करत परिसरात अशांतता निर्माण केली जाते. या सर्व संभाव्य तक्रारींबाबत सावधगिरीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

CM Devendra Fadnavis On Happy New Year 2025
Happy New Year 2025 : “महाराष्ट्र आता थांबणार नाही…”, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे अन् अजित पवारांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
अँडरसन प्रथमच ‘आयपीएल’मध्ये? लिलावासाठी १५७४ खेळाडूंची नोंदणी,स्टोक्स मुकणार; नेत्रावळकरचा समावेश
अँडरसन प्रथमच ‘आयपीएल’मध्ये? लिलावासाठी १५७४ खेळाडूंची नोंदणी,स्टोक्स मुकणार; नेत्रावळकरचा समावेश
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
India before modernity
ना उजवा, ना डावा; का होतोय भारतीय इतिहासाच्या पुनर्लेखनाचा शास्त्रीय विचार?

आणखी वाचा-नववर्षाच्या स्वागतासाठी… पर्यटनस्थळांवर गर्दी मोठी!

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी पाच पथके नेमण्यात आली आहेत. दारूची दुकाने रात्री साडेदहाऐवजी मध्यरात्री एकपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्य पिण्यासाठी तात्पुरता परवाना घेणे आवश्यक आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभागाकडे परवानगी मागणी अर्ज आले आहेत.

दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी येथील बाजारपेठा रोषणाईने सजल्या आहेत. कास पठारावर मोठी गर्दी आहे. अनेक हॉटेल अगोदरच आरक्षित झालेली आहेत. तापोळा, कास पठार, कोयनानगर परिसरात व जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या धरणांच्या क्षेत्रातदेखील पर्यटक येऊ लागले आहेत. जल्लोषी कार्यक्रमामुळे वन्य जीवांना त्रास होऊ नये यासाठी जिल्ह्यात महाबळेश्वर, कास वन विभागाकडूनही बंदोबस्त वाढवला आहे.

आणखी वाचा-निवडणूक वर्षात ७२ कोटी ७० लाख लिटर मद्यविक्री !

खासगी बंगले, हॉटेल, फार्म हाऊस येथे पार्टी करण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी. डोंगर, टेकड्या, जंगलात निसर्गाला बाधा होईल, असे कोणतेही वर्तन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मादक पदार्थांचे सेवन, मद्य पिऊन वाहन चालवणे, ध्वनिप्रदूषण, वन क्षेत्रात आतषबाजी केल्यास कारवाई करण्यात येईल. सर्वांनी कायद्याचे पालन करत नववर्षाचे स्वागत करावे. -समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा</strong>

बनावट व अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी पाच पथके तैनात आहेत. सांगीतिक कार्यक्रमात मद्यसेवन किंवा मद्यपुरवठा यासाठी तात्पुरता परवाना दिला जातो. असे परवाने न घेता कार्यक्रम करणे, मद्याची वाहतूक केल्यास, तसेच अमली पदार्थांचा वापर केल्यास कारवाई करण्यात येईल. -माधव चव्हाण, उत्पादन शुल्क विभाग, सातारा

Story img Loader