पुणे / छत्रपती संभाजीनगर / रत्नागिरी : पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, सातारा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर, सोलापूर आणि माढा, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि कोकणातील रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या ११ मतदारसंघात मंगळवारी उत्साहात मतदान पार पडले. रात्री आठ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी ५४.९८ टक्के मतदान झाले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये मतदान कमी झाले असून कोल्हापूरात सर्वाधिक मतदान झाल्याचे चित्र आहे.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील अटीतटीच्या लढाईने मतदानाच्या दिवशी भावनिक रूप घेतले. सुळे यांनी अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षांत प्रथमच बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. मात्र संध्याकाळपर्यंत कमी मतदान झाल्याने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात मतदानाचा उत्साह सर्वाधिक होता. मतदान करण्याची वेळ संपली, तरीही काही केंद्रांवर रांगा होत्या. दोन्ही ठिकाणी ७० टक्क्यांहून अधिक मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले आणि पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यातील लढतीत चुरस दिसून आली. सातारा शहर, कोरेगाव आणि कराड परिसरात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सांगलीत उन्हाचा कडाका असतानाही अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. माढ्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होेते. सोलापुरात दुपारी ओस पडलेल्या मतदान केंद्रांवर सकाळी आणि सायंकाळी मात्र् रांगा लागल्याचे चित्र होते.

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी

हेही वाचा >>> काँग्रेसकडून कसाबला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र ; नगरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

लातूर व उस्मानाबाद या मराठवाड्यातील मतदारसंघांत पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मतटक्का घसरल्याचे दिसून येत आहे. मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही वेळ मतदान थांबण्याचे प्रकार दोन्ही मतदारसंघांत घडले.

लातूर लोकसभा मतदारसंघातील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवीच्या मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्के अधिक मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर रायगडमध्ये सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याची शक्यता आहे. तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया थांबल्याच्या किरकोळ घटना काही ठिकाणी घडल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. येथे भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वेळी बारामतीमध्ये तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातील कलबुर्गी येथे मतदान केले.

Story img Loader