इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अलिबाग शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघा घाटे यांना राज्यस्तरीय बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुंबईतील जेडब्लू मॅरिएट इथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
मुंबईतील जेडब्लू मॅरिएट इथे आयएमएचे राज्यस्तरीय मॅस्टॅकॉन अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनाला राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी उपस्थित होते. या अधिवेशनात अलिबागच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. मेघा घाटे यांना बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या याच अधिवेशनात अलिबाग शाखेला बेस्ट स्मॉल ब्रँच असा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता.
डॉक्टर मेघा घाटे या गेल्या तीन वर्षांपासून आयएमए शाखेच्या अध्यक्षा आहेत, तर शाखेतील सर्व पदाधिकारी या महिला डॉक्टर आहेत. असोसिएशनचे सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याचे डॉ. मेघा घाटे यांनी सांगितले.

Story img Loader