आळंदीचे विश्वनाथ जोशी गुरूजी, पुण्याच्या सुचेता भिडे-चाफेकर, आणि नाशिकचे क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांना येथील पूर्णवाद परिवाराच्या वतीने देण्यात येणारे ‘पूर्णवाद विद्या कला नीति पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. येथील प्रसाद मंगल कार्यालयात दोन डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
वेदशास्त्रातील अग्रणी इंदूरचे प्रल्हाद गुरू पारनेरकर व त्यांचे सहध्यायी पुरूषोत्तम काका भडकमकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘पूर्णवाद वेदमूर्ती पुरस्कार’ आळंदीचे वेदशास्त्रसंपन्न विश्वनाथ जोशी गुरूजी यांना जाहीर झाला आहे. तसेच इंदूरचे संगीत शिरोमणी पं. राजाभेैया पूंछवाले आणि नाशिकचे पं. गजाननबुवा सरवटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या ‘पूर्णवाद संगीत उपासक’ पुरस्काराने पुण्याच्या सुचेता भिडे-चाफेकर यांना सन्मानित करण्यात येईल. नाशिकचे समाजभूषण शं. पु. जोशी तथा बापूसाहेब जोशी आणि अॅड. दादासाहेब राजेशिर्के यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘पूर्णवाद सत्यबोध समाजभूषण पुरस्कार’ नाशिकचे भीष्मराज बाम यांना देण्यात येणार आहे. जळगावचे डॉ. नंदकुमार बेंडाळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून हिंदुस्थान हार्डीस्पायसरचे व्यवस्थापकीय संचालक अशोक राजवाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. पुरस्कार सोहळ्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता सुचेता भिडे-चाफेकर यांचा नृत्याविष्कार होणार आहे. एक डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता अॅड. गुणेशदादा पारनेरकर यांचा अभ्यासवर्ग होणार आहे. तसेच सायंकाळी सात वाजता अखिल विश्वात्मक पूर्णवाद परिवारातर्फे अण्णामामा देशपांडे यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा होणार आहे. दरम्यान दोन ते पाच डिसेंबर या कालावधीत म्हसरूळ येथील शिवराम मंदिरात विशेष कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पूर्णवाद परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.
जोशी, भिडे, बाम यांना ,पूर्णवाद पुरस्कार जाहीर
आळंदीचे विश्वनाथ जोशी गुरूजी, पुण्याच्या सुचेता भिडे-चाफेकर, आणि नाशिकचे क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांना येथील पूर्णवाद परिवाराच्या वतीने देण्यात येणारे ‘पूर्णवाद विद्या कला नीति पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.
First published on: 30-11-2012 at 04:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Award to joshi bhide baam