पाक्षिक सिंधुरत्नतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रेमपत्र लेखन स्पर्धेत पुरुष गटात घणसोलीचे विलास समेळ यांनी, तर महिला गटात पेणच्या रेखा चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २४ नोव्हेंबर रोजी अलिबाग येथे होणार आहे. प्रेमपत्र लेखन स्पर्धेत पुरुष गटात विलास समेळ यांनी प्रथम, चेंढर- अलिबाग येथील के. पी. पाटील यांनी द्वितीय, तर नेरुळचे मिलिंद कल्याणकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अलिबागचे कैलास पिंगळे व सिंधुदुर्गचे वैभव खानोलकर यांची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. महिलांमध्ये पेणच्या रेखा चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कोपरखैरणेच्या ज्योती जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. अलिबागच्या आशा राईरकर व विजया चाफेकर यांना संयुक्तपणे तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. पनवेलच्या आदिती मराठे, महाडच्या ममता मेहता, चाळमळाच्या रुपाली कदम यांची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. पी.एन.पी. महाविद्यालयाचे मराठी भाषा अधिव्याख्याता प्राध्यापक डॉ. ओमकार पोटे यांनी स्पर्धेतील पत्रांचे परीक्षण केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता कै. हेमलता जोशी सभागृह, श्री राम मंदिर, ब्राह्मणआळी, अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ कवी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, गझलकार अप्पर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, अलिबागच्या नगराध्यक्षा नमिता नाईक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत तिरोडकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सुनंदा देशमुख या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुजाता पाटील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा