शहरातील समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘प्रबोधन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पंचवटी कारंजाजवळील पलुस्कर सभागृहात हा पुरस्कार सोहळा उपमहापौर सतीश कुलकर्णी, नगरसेविका शालिनी पवार व अरुण पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संस्थेचे जिल्हाध्यक्ष विवेक देशपांडे यांनी दिली.  समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करीत असलेल्या १३ मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये समाज कार्यासाठी राजेंद्र शिंदे, परभणी येथील जगन्नाथ शेजवळ, सांस्कृतिक कार्यासाठी ज्ञानदेव भालके, कृषीसाठी सुरेश जगताप, संगणक व तंत्रज्ञानासाठी परिमल मुजुमदार, शैक्षणिकसाठी मनोज ढिकले, दत्तात्रय कस्तुरे, सोलापूर येथील सुरेखा महादसवाड, कामगार क्षेत्रासाठी शरद महाले, शोध पत्रकारितेसाठी रत्नदीप सिसोदिया, अध्यात्मासाठी पुणे येथील डॉ. अरविंद भागवतबाबा, चित्रकलेसाठी आनंद सोनार, शाहिरीसाठी आनंद मुळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे राज्य अध्यक्ष गिरीश पाटील, उपाध्यक्ष अरुण संधानशिव यांनी केले आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा