हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकिट कापलं आहे. हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील यांना तिकिट देण्यात आलं आहे. यानंतर अयोध्या पौळ पाटील यांनी जुने व्हिडीओ पोस्ट करत हेमंत पाटील यांच्या प्रमाणेच श्रीकांत शिंदेंचाही पत्ता कट होईल असे संकेत दिले आहेत. ही पोस्ट चर्चेत आहे.

तीन दिवसांपासून सुरु होती चर्चा

मागच्या तीन दिवसांपासून हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं. अखेर शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाला. भाजपानं हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर आता बाबूराव कदम हे शिवसेनेचे हिंगोलीचे नवे लोकसभेचे उमेदवार आहेत. कदम यांनी २०१९ मध्ये अपक्ष म्हणून हदगाव विधानसभा लढवली होती. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मतंही त्यांना मिळाली. मात्र हेमंत पाटील यांचं तिकीट भाजपच्या दबावामुळे बदलावं लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी अडचण आणि नामुष्की ओढवली आहे. अशात आता श्रीकांत शिंदे यांचीही अशीच गत होईल हे अशी खोचक पोस्ट अयोध्या पौळ पाटील यांनी केली आहे.

Who is Justice Sanjiv Khanna_ Justice Sanjiv Khanna Landmark judgments
Justice Sanjiv Khanna: कलम ३७० ते निवडणूक रोख्यांवर बंदी; हे ऐतिहासिक निकाल देणारे न्यायमूर्ती संजीव खन्ना कोण आहेत? खुद्द न्या. चंद्रचूड यांनी दाखविला विश्वास
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
manoj jarange patil criticized devendra fadnavis
“आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”, आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले…
umesh patil
“मी अजितदादांवर नाराज नाही”, शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया
tore down the banner of former BJP MLA Narendra Pawar
कल्याणमध्ये भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचे फलक अज्ञातांनी फाडले
Anikta Patil Resigns From BJP Before Father Harshvardhan Patil
Ankita Patil : हर्षवर्धन पाटील यांच्याआधी अंकिता पाटील यांचा भाजपाला राम राम, म्हणाल्या, “मी…”
What Devendra Fadnavis Said About Sharad Pawar and Uddhav Thackeray?
Devendra Fadnavis : “शरद पवारांनी इतक्या लोकांचे पक्ष फोडले त्यांचा पक्ष..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”

हे ही वाचा- अयोध्या पौळ यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे कल्याणच्या उमेदवारीची चर्चा; नंतर खुलासा करत म्हणाल्या…

काय म्हटलं आहे अयोध्या पौळ पाटील यांनी?

माझी आई लहानपणापासून मला म्हणते “कार्टेऽऽ काळतोंऽडे कोणालाही काहीही मनापासून बोलत जाऊ नकोस, काळ्या जिभेची आहेस समोरच्याचं दुकान बंद होतंय तुझ्या बोलण्यानं….. आई म्हणते म्हणजे खरंच असेल…” “हॅशटॅग जसा माझा श्रीकांत तसा हेमंत”..
“हॅशटॅग अन्याय होऊ देणार नाही”.. ही पोस्ट त्यांनी केली आहे. तसंच १८ मार्च २०२४ चा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे ज्यात त्या म्हणतात की हेमंत पाटील यांना तिकिट मिळणार नाही.

काय म्हटलं आहे व्हिडीओत?

हेमंत पाटीलने आधी तिकिट मिळवून दाखवावं. हेमंत पाटीलला तिकिट कसं मिळवायचं मी सांगते, तुला तिकिट मिळणार नाही पण तिकिट कसं मिळवायचं मी सांगते. हेमंतदादा तुझी आणि श्रीकांत शिंदेची चांगली मैत्री आहे. त्यामुळे तू रड, हात-पाय पकड, वेळ पडली तर लोटांगण घाल पण तिकिट मिळवून दाखव. हेमंत पाटीलना माझ्या शुभेच्छा आहेत. तू तिकिट मिळवलंस तर काही लाख मतांनी इथे पडणार आहेस. जर हेमंत दादाला तिकिट मिळालं आणि तो निवडून आला तर त्याची आरती ओवाळायला मी जाईन. असं झालं नाही तर मला नाचता येत नाही पण मी गणपती डान्स नक्की करेन. असं अयोध्या पौळ पाटील म्हणाल्या होत्या. तो व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे.