महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून केलेल्या सभेतून आणि त्यानंतर ठाणे येथील उत्तर सभेमधून मशिदींवरील भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवाय, यावरून मोठ्याप्रमाणावर आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात काल राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना दोन मोठ्या घोषणा केल्या. ”५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे आणि महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे.” असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेवर काँग्रेसकडून निशाणा साधण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते. सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी? असं ट्वीट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांनी काढलेले एक व्यंगचित्र शेअर केलं आहे.

ज्यामध्ये प्रभू श्रीराम हे चलो अयोध्या असं म्हणणाऱ्या विश्व हिंदू परिषद व भाजपा यांना उद्देशून “अहो देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते. ‘राममंदिर’ नव्हे…!” असं म्हणत असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. शिवाय, शेवटी हे राम…! असंही लिहिलेलं दिसत आहे.

तर, शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे हे देखील लवकरच अयोध्येला जाणार आहेत. “अयोध्येत जो संघर्ष होता तो न्यायालयाने संपवलेला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे अयोध्येत मंदिर बनत आहे. ज्यावेळी संघर्ष सुरू होता तेव्हा आम्ही गेलेलो, त्यावेळी आम्ही सांगितलं की पहिले मंदिर फिर सरकार, तसं ते काम सुरू झालं आणि आता आम्ही चाललो ते दर्शनासाठी चाललो, आमची स्वत:ची जिथं श्रद्धा आहे तिथे आम्ही चाललो आहोत. यामध्ये कुठेही राजकीय हेतू नाही. धर्म हा आपल्या मनात असतो. आपण मंदिरात जात असतो, काल मी देखील हनुमान चालीसा पठण केलं.” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे.