कासा : कासा येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या तरुणीला उपचासाठी सिल्वास येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कासा पोलीस ठाणे हद्दीत कासा गाव, डोंगरी पाडा येथे राहणारी पूनम आज सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास पोलीस भरती प्रशिक्षण देणाऱ्या खासगी अकॅडमीकडे जात असताना अज्ञात व्यक्तीने पूनमवर धारधार शस्त्राने हल्ला केला. यानंतर तिला प्रथम कासा उपजिल्हा रुग्णालय व नंतर वेदांता हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीकडून मुलीच्या डोक्यावर, गालावर व पाठीमध्ये वार करण्यात आले आहेत. जखमी मुलगी बोलण्याच्या स्थितीत नसून पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader