मराठी भाषा विभागातंर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा सल्लागार समिती आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेनुसार, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रकाशक बाबा भांड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांची मराठी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी दिलीप करंबेळकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत तीनही मंडळांच्या समिती अध्यक्ष व सदस्यांची घोषणा केली.
आणखी वाचा