ज्येष्ठ निरुपणकार, कीर्तनकार, प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज निधन झालं. बाबा महाराज सातारकर यांनी संपूर्ण आयुष्य कीर्तन परंपरेला वाहिलेलं होतं. बाबामहाराज सातारकर यांच्या घरातच वारीची आणि संतवाड्:मयाची परंपरा होती. त्याचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला. विठ्ठल सोप्या शब्दांमध्ये सांगणारी एक वाणी आज शांत झाली आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय आणि विठ्ठलभक्तांवर शोककळा पसरली आहे.

सातारा या ठिकाणी झाला जन्म

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ ला झाला. नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं त्यांचं नाव होतं. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या घरात १३५ वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर महाराज सातारकर यांचे वडील दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंग वादक होते. तर त्यांचे चुलते अप्पा महाराज सातारकर आणि अण्णा महाराज सातारकर परमार्थाचे धडे त्यांनी घेतले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी मृदूंग वादनाचे धडे घेतले. तर २६ मार्च १९५४ ला बाबा महाराज सातारकर यांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
cm Devendra fadnavis pa
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश, तरी पी.ए. होण्यासाठी उड्यावर उड्या…

निरुपणकार होण्याआधी वडिलांना काय सांगितलं?

१९५० ते १९५६ या काळात बाबा महाराज सातारकर यांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. “१९५६ मध्ये माझा पाच ते सहा लाखांचा फर्निचरचा व्यवसाय होता. पण तो व्यवसाय मी करणं थांबवलं. जे काही होतं ते कवडीमोल दरात विकलं. मी माझ्या वडिलांना सांगितलं की ज्याला भांडवल लावलं आहे ते विकून टाकू आणि ज्यासाठी रक्त ओकलं आहे ते टिकवून धरु. जे प्रारब्धात असेल ते होईल. असं सांगत मी हा व्यवसाय बंद केला आणि कीर्तन करु लागलो” असंह बाबामहाराज सातारकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. एक फर्निचर व्यावसायिक अशा पद्धतीने ज्येष्ठ कीर्तनकार, निरुपणकार झाला.

बाबा महाराज म्हणाले होते “जर फर्निचरचा व्यवसाय मी बंद केला नसता तर मला कोट्यवधी रुपये मिळाले असते. पण व्यापारी म्हणून मला लोकांनी ओळखलंही नसतं. त्या दुकानात खुर्ची चांगली मिळते. पण आज माझं जगभरात नाव आहे का? तर वारकरी आहे म्हणून.वारकरी झालो त्याचीच फलश्रुती आहे. वारकरी संप्रदाय हा सर्वांना बरोबर घेऊन चालतो. स्तुती करत नाही आणि निंदाही करत नाही. दुसऱ्याच्या निंदेवर तुमची इमारत कच्ची आहे हेच आमचा वारकरी संप्रदाय सांगतो” असंही त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं. ८० वर्षांपासून ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या मानकरी परंपरा त्यांच्या घरात आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची मानकरी परंपरा १०० वर्षांपासून त्यांच्या घरात आहे.

बाबामहाराज सातारकर यांना मिळालेले पुरस्कार

१. श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार,

२. महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार,

३. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट,तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे.

४. पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत.

बाबामहाराज सातारकर यांचे ट्रस्ट

१. श्री चैतन्य आध्यत्मिक ज्ञान प्रसार संस्था – १९८३

२. बाबामहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान – १९९०

या दोन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष बाबामहाराज सातारकर आहेत.

विठ्ठलाच्या मंदिरात जायला बंदी का नाही? बाबा महाराज सातारकर यांनी सांगितलं कारण

“पुंडलकाची आई वडिलांची भक्ती पाहून विठ्ठल स्वतः आला. ही केवढी मोठी सामाजिक घटना आहे. ज्याला आई नाही आणि बाप नाही तो पांडुरंग. कारण पांडुरंगच सगळ्यांचा आई बाप आहे. विठ्ठल बाप, माय, चुलता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल आमचे जीवन. आगम निगमाचे स्थान, विठ्ठल आमचा निजाचा. सज्जन सोयरा जिवाचा. माय, बाप, चुलता, बंधू अवघा तुझसी संबंधू ! समर्पिली काया तुका म्हणे पंढरीराया! हे तुकारा महाराजांनी म्हणून ठेवलं आहे. या भूमिकेतू विठ्ठलाचा अवतार आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरात जायला बंदी नाही. काही काळ होती. सानेगुरुजींनी ती बंदी हटवली.” असं बाबा महाराज सातारकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

वारकरी संप्रदायात एकनाथांनी दाखवून दिलं की कुणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. ज्याच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे तो पवित्रच आहे. तसं जीवनात उलटसुलट गोष्टी घडणारच. परिपूर्णतेने सुखी कोण आहे? कुणीच नाही. पण ज्या उणिवा वारीत भरुन निघतात. सगळ्या गोष्टींशी जुळवून घ्यायला पंढरीची वारी शिकवते. सहनशीलता वारी शिकवते. वारीतली सहनशीलता घरी आली तर अवघाची संसार झालाच म्हणून समजा. असंही बाबा महाराज सातारकर यांनी म्हटलं होतं. विठ्ठल, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या रचना ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. त्यांचा आदर्श समोर ठेवत पुढे अनेक कीर्तनकार घडले आहेत. विठ्ठलाशी एकरु होऊन त्याचा विचार सगळ्यांपर्यंत पोहचवणारे बाबा महाराज सातारकर यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे. मात्र त्यांच्या प्रवचनांमधून ते कायमच आपल्या बरोबर राहतील यात शंका नाही.

Story img Loader