Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांची दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबरला तीन हल्लेखोरांनी हत्या केली. यातल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या आधी काय घडलं आणि आत्तापर्यंत काय घडलं? हे आपण जाणून घेऊ.

१२ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता बाबा सिद्दीकींची हत्या

१२ ऑक्टोबरला रात्री ९ च्या सुमारास बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी तीन हल्लेखोर आले त्यांनी गोळ्या झाडल्या. ज्यानंतर बाबा सिद्दीकी कोसळले. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

तुरुंगात शिजला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट

पटियाला तुरुंगात बाबा सिद्दीकींच्या ( Baba Siddique ) हत्येचा कट शिजला अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातला फरार आरोपी झिशान याने हरियाणत गुरुमीत सिंह आणि धर्मराज कश्यपसह शिव कुमार यांची भेट घेतली होती. याबाबतचे निर्देश झिशानच या तिघांना देत होता. बाबा सिद्दीकींच्या लोकेशनची माहिती झिशानच हल्लेखोरांना देत होता.

हे पण वाचा- बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर बिश्नोईचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पाकिस्तानी गँगस्टर भट्टीला…

भंगार विक्रेते शूटर्स

बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांचाही भंगारचा व्यवसाय आहे. पुण्यात हे दोघं भंगार विक्रेते म्हणून काम करतात. यातला तिसरा आरोपी शुभम लोणकर याच्या फेसबुक पेजवर हत्येबाबतची पोस्ट करण्यात आली. तर त्याचा भाऊ प्रवीण लोणकर हा डेअरीमध्ये काम करत होता. धर्मराज आणि शिवकुमार तसंच गुरमेल या तिघांना शुभम लोणकरने सिद्दीकी यांच्या हत्येसाठी सुपारी दिली. ही सुपारी तीन लाखांची असल्याची माहितीही पोलिसांनी न्यायालयात दिली.

बाबा सिद्दीकींच्या हत्या कशी घडवून आणायचं ठरलं?

बाबा सिद्दीकींच्या ( Baba Siddique ) डोळ्यांत पेपर स्प्रे मारायचा आणि त्यांच्यावर गोळ्या झाडायच्या असा कट आखण्यात आला होता. बाबा सिद्दीकींवर गुरमेल सिंहने गोळ्या झाडल्या. या प्रकरणात आत्तापर्यंत गुरमेल सिंह, प्रवीण लोणकर आणि धर्मराज कश्यप अशा एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवकुमार आणि शुभम लोणकर हे आरोपी फरार आहेत.

१२ ऑक्टोबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

१२ ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे या ठिकाणी बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे त्यांच्या मुलाच्या ऑफिसकडे जात होते. त्यावेळी दसरा असल्याने लोक फटाके वाजवत होते, या फटाक्यांच्या आवाजत बाबा सिद्दीकींवर तीन रुमाल बांधलेल्या लोकांनी येऊन गोळीबार केला. त्यांनी एका पाठोपाठ एक सहा राऊंड झाडले. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. दोन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. तर तिसरा आरोपी हा शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर आहे. शुभम लोणकर आणि शिव कुमार हे दोघं फरार आहेत. ज्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर रविवारी १३ ऑक्टोबरला अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. या प्रकरणात गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी धर्मराज कश्यप अल्पवयीन आहे असा दावा त्याच्या वकिलांनी केला होता. ज्यानंतर त्याची अस्थिभंग चाचणी म्हणजेच वय निश्चिती करणारी चाचणी करण्यात आली ज्यात तो अल्पवयीन नसल्याचं सिद्ध झालं. या दोन्ही आरोपींना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.