Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. मुंबईसह महाराष्ट्र या घटनेने हादरला आहे. तीन हल्लेखोरांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक हल्लेखोर फरार आहे. यातील दोन हल्लेखोरांची नावं मुंबई पोलिसांनी सांगितली आहेत. यातला एक हल्लेखोर हा उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा आहे.

वांद्रे सिग्नलवर नेमकं काय घडलं?

बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर ( Baba Siddique ) गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. हे तीन लोक कोण होते? ते अद्याप समजू शकलेलं नाही. बाबा सिद्दीकींवर कुणी गोळीबार केला? त्यामागचं कारण काय होतं? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातल्या दोन हल्लेखोरांची नावं समजली आहेत.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा

हे पण वाचा- Baba Siddique : बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या, राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “ही घटना…”

काय आहेत हल्लेखोरांची नावं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करनैल सिंह हा हरियाणाचा राहणारा आहे आणि धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशातला राहणारा आहे. यांच्यास आणखी एक हल्लेखोर होता. जो फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आऱोपीची चौकशी सुरु आहे. बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी आरोपींना पैसे दिले गेले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांना हत्यारं पुरवण्यात आली होती. मुंबई पोलीस मागील आठ तासांपासून या हल्लेखोरांची कसून चौकशी करत आहेत. मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींच्या घराची रेकी केली होती अशीही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. बाबा सिद्दीकींवर ( Baba Siddique ) गोळीबार झाल्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी काय घडलं ही माहिती डॉक्टर जलील पारकर यांनी दिली.

डॉ. जलील पारकर काय म्हणाले?

“साधारण ९.३० च्या सुमारास बाबा सिद्दीकींना ( Baba Siddique ) रुग्णालयात आणलं गेलं. आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं. त्यांची पल्स मिळत नव्हती. ब्लड प्रेशरही मिळत नव्हतं. आम्ही त्यांचा ईसीजी काढला तेव्हा तो फ्लॅट लाईन आला. आम्ही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. रक्तस्त्राव थांबावा आणि ब्लड प्रेशर वर जावं यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. त्यांना तशी औषधंही देण्यात आली. पण ११.२५ च्या दरम्यान आम्ही त्यांना मृत घोषित केलं. बाबा सिद्दीकींना ( Baba Siddique ) दोन गोळ्या छातीवर लागल्या होत्या आणि त्या आरपार गेल्या होत्या. अत्यंत जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले पण ते वाचू शकले नाहीत.” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.