Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने प्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट शुबू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक पेजवरून शेयर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. शुबू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर आहे, अशी माहिती पुढे आली होती. या दृष्टीने पोलीस तपास करत होते. या प्रकरणात त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक करण्यात आली.

रविवारी नेमकं काय घडलं?

पोलिसांनी त्याच्या अकोट येथील घरी दाखल झाले. मात्र, घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता, दोघेही भाऊ पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पुण्यातील घरी छापा टाकला. त्यावेळी शुभम लोणकर हा फरार असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. तसेच पोलिसांनी त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली. हे दोघेही बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कटात सहभागी होते, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस आता शुभम लोणकर याचा शोध घेत आहेत.शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Aditya thackeray and uddhav thackeray
Uddhav Thackeray Health Update : उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीविषयी आदित्य ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, “आज सकाळी…”
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का; विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या आमदारासह ‘या’ नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’
Lawrence Bishnoi Gang 10 Targets
Lawrence Bishnoi : सलमान खानप्रमाणे ‘हे’ १० जण बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर, NIA समोर लॉरेन्सनेच दिलेली कबुली
Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray Hospitalized at Reliance Hospital for Angioplasty
Uddhav Thackeray Hospitalized : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
Noel Tata New Chairman of Tata Trust Latest News
टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

हे पण वाचा- बाबा सिद्दीकी यांच्यासह झिशान सिद्दीकीही होते रडारवर, हल्लेखोरांचा नेमका कट काय होता?

१२ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता बाबा सिद्दीकींची हत्या

१२ ऑक्टोबरला रात्री ९ च्या सुमारास बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी तीन हल्लेखोर आले त्यांनी गोळ्या झाडल्या. ज्यानंतर बाबा सिद्दीकी कोसळले. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पटियाला तुरुंगात बाबा सिद्दीकींच्या ( Baba Siddique ) हत्येचा कट शिजला अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातला फरार आरोपी झिशान याने हरियाणत गुरुमीत सिंह आणि धर्मराज कश्यपसह शिव कुमार यांची भेट घेतली होती. याबाबतचे निर्देश झिशानच या तिघांना देत होता. बाबा सिद्दीकींच्या लोकेशनची माहिती झिशानच हल्लेखोरांना देत होता.

बाबा सिद्दीकींच्या हत्या कशी घडवून आणायचं ठरलं?

बाबा सिद्दीकींच्या ( Baba Siddique ) डोळ्यांत पेपर स्प्रे मारायचा आणि त्यांच्यावर गोळ्या झाडायच्या असा कट आखण्यात आला होता. बाबा सिद्दीकींवर गुरमेल सिंहने गोळ्या झाडल्या. या प्रकरणात आत्तापर्यंत गुरमेल सिंह, प्रवीण लोणकर आणि धर्मराज कश्यप अशा एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवकुमार आणि शुभम लोणकर हे आरोपी फरार आहेत.

१२ ऑक्टोबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

१२ ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे या ठिकाणी बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे त्यांच्या मुलाच्या ऑफिसकडे जात होते. त्यावेळी दसरा असल्याने लोक फटाके वाजवत होते, या फटाक्यांच्या आवाजत बाबा सिद्दीकींवर तीन रुमाल बांधलेल्या लोकांनी येऊन गोळीबार केला. त्यांनी एका पाठोपाठ एक सहा राऊंड झाडले. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. दोन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. तर तिसरा आरोपी हा शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर आहे. शुभम लोणकर आणि शिव कुमार हे दोघं फरार आहेत. ज्यांचा शोध पोलीस घेत आहेत.