मुंबईतील काँग्रेसचा एक महत्त्वाचा नेता, माजी आमजार, माजी मंत्री आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले बाबा सिद्दीकी यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा काँग्रेससाठी धक्कादायक आहे. आज (१० फेब्रुवारी) त्यांनी अजित पवार गटात त्यांनी जाहीर प्रवेश केला. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्तेही आज अजित पवार गटात सहभागी झाले. या कार्यक्रमात अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही सहभागी झाले होते. बाबा सिद्दीकी ४८ वर्षे अधिक काळ काँग्रेसमध्ये होते. ‘अलविदा’ असं ट्विट करून त्यांनी काँग्रेसला माहिती दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या ४८ वर्षांनंतर मी आज पहिल्यांदा काँग्रेससाठी भाषण करत नाहीय, असं बाबा सिद्दीकी आपल्या भाषणात सुरुवातीलाच म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या निर्णयाबाबत बाबा सिद्दीकी म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांच्या घरी न्याहारी करताना ही चर्चा झाली, त्याच दिवशी १० तारखेला मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे ठरले. मी त्याच दिवशी काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि ४८ वर्षांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. मी एक खुले पुस्तक आहे. मी कुटुंबाचा माणूस आहे. मला कोणाचेही नुकसान करायचे नाही. येथे समजाचे राजकारण सुरू आहे, त्यामुळे निर्णय घ्यावा लागला. मी सांगितले की मला डिवचू नका, अन्यथा मी सोडणार नाही. मी विश्वासघात करणार नाही. मला प्रत्येक हातात अजित पवारांचे घड्याळ हवे आहे. तसंच, सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे. आपल्या पूर्वजांनी जे स्वप्न पाहिलं होतं तसा भारत निर्माण करू.

माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी जानेवारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गेल्या एका महिन्यात पक्ष सोडणारे बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते आहेत. सिद्दीकी यांचा मुलगा झीशान हेसुद्धा आमदार आहेत, पण त्यांनी अद्याप पक्ष सोडलेला नाही. परंतु, तेही अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddiquis public entry into ajit pawar group said after 48 years sgk
Show comments