Babanrao Lonikar : बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये बबनराव लोणीकर म्हणत आहेत मराठ्यांची मतं ही बोटांवर मोजण्याइतकी हेत. विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर ( Babanrao Lonikar ) यांची डोकेदुखी वाढली असून त्यांनी आता या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोणीकर काय म्हणताना दिसत आहेत?

आष्टी गावात अठरापगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची मतं बोटांवर मोजण्याइतकी आहेत. मात्र हे गाव सर्व समाजांचं गाव आहे. सगळ्या जाती-धर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत. मराठा, धनगर, माळी, फुलारी, आगलावे, शेंडे, कांबळे सगळे आहेत. असं या व्हिडीओत बबनराव लोणीकर ( Babanrao Lonikar ) म्हणताना दिसत आहेत. मराठा मतं बोटांवर मोजण्याएवढीच आहेत या विधानाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. यानंतर आता बबनराव लोणीकर ( Babanrao Lonikar ) यांना या प्रकरणी स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे.

हे पण वाचा- लक्षवेधी लढत: धनंजय मुंडेंसमोर ‘मराठा उमेदवाराचे’ आव्हान

लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर चर्चेत राहिला होता

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टरने भाजपाला दणका दिला होता. या वेळीही मनोज जरांगे हे विधानसभेलाही उमेदवार देणार होते. मात्र त्यांनी तसं केलं नाही. मनोज जरांगेंनी आंतरवली सराटीतून त्यांचं आंदोलन सुरु केलं आहे. मी कुणाला पाडा, कुणाला निवडून द्या हे आता सांगणार नाही. ज्याला मतदान करणार आहात त्यांच्याकडून लेखी घ्या असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चांगलाच चर्चेत राहिला. दरम्यान हे सगळं घडत असतानाच बबनराव लोणीकर यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकीच आहेत असं वक्तव्य असलेला बबनराव लोणीकरांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर आता बबनराव लोणीकर ( Babanrao Lonikar ) यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण काय?

“माझ्या भाषणात मी म्हणालो की मराठा समाजाची मतं या गावात कमी आहे. गाव एससी. एसटी, एनटी, व्हिजेएनटी, ओबीसी, मुस्लिम अशा अठरापगड जातींचं गाव आहे. ४० वर्षे या गावाने भाजपाला मताधिक्य दिलं आहे. मराठा समाजाची ६० ते ७० टक्के मतं मला मिळतात. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करुन व्हिडीओ व्हायरल केला आहे. तो खोटारडेपणा आहे.” असं बबनराव लोणीकर ( Babanrao Lonikar ) म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babanrao lonikar video viral he saying maratha votes are very few what did he say scj