Babanrao Shinde Madha MLA Ajit Pawar NCP : माढा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. बबनराव शिंदे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार का? यावर खलबतं चालू आहेत. दुसऱ्या बाजूला, अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असून आगामी निवडणुकीच्या काळात त्या गटातील अनेक आमदार व पदाधिकारी शरद पवार गटात येतील अशा प्रकारचे वेगवेगळे दावे शरद पवार गटातील नेते करत आहेत. त्यामुळे बबनराव शिंदे शरद पवार गटात जातील का यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच आता बबनराव शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. स्वतः बबनराव शिंदे यांनी माढ्यातील नागरिकांशी बोलत असताना याबाबतचे संकेत दिले आहेत.
Babanrao Shinde : शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांच्या आमदाराची निवडणुकीतून माघार? माढ्यात काय शिजतंय?
Babanrao Shinde Madha MLA : माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-08-2024 at 22:18 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअजित पवारAjit Pawarराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवारNCPSCPशरद पवारSharad PawarसोलापूरSolapur
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babanrao shinde madha mla may withdrew candidature assembly election 2024 ncp ajit pawar asc