अमली पदार्थ साठय़ाच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बेबी पाटणकर हिला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे धर्मराज काळोखेच्या कण्हेरी (ता खंडाळा) येथून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ साठय़ाचा उलगडा होणार आहे. या प्रकरणात खंडाळा न्यायालयाने बेबी पाटणकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
     कण्हेरी (ता खंडाळा) येथून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील हवालदार धर्मराज काळोखे यांच्या घरी छापा टाकून सुमारे २२ कोटींचा ११२ किलो मॅफीडॉन या अमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. यावेळी धर्मराज काळोखेच्या चौकशीत बेबी पाटणकर ही मुंबईतील महिला मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे आली होती. हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा पासून मुंबई व सातारा पोलिसांनी संयुक्त तपास मोहीम राबविली होती. बेबी पाटणकरला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर बेबी पाटणकरला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे अधिक तपास करत आहेत. त्यांना एस.एस.गोडबोले, एस. टी बारेला आणि स्थानिक गुन्हे अन्वेशनचे भिसे व खंडाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader