देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यावर महाराष्ट्रातील विधानसभेचं बिगुल वाजतं. पण, २०२४ साली लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपाने पक्षाच्या नेतृत्वाला एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाचा भाजपा नेतृत्व विचार करत असून, यावर शिक्कामोर्तब झाल्यास लोकसभेबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका होतील. यासंदर्भात ‘द हिंदू’ने वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणूक एप्रिल-मे २०२४ साली होणार आहेत. तर, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये अपेक्षित आहे. पण, राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. यावर आता प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : शरद पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीने दादा भुसेंना घेरलं, शंभूराज देसाई आले मदतीला धावून; नेमकं काय घडलं?

“एकत्र होऊद्या नाहीतर, वेगळे होऊद्या मते तर लोकच देणार आहेत. पाकिस्तानची लोक थोडीच मतदान करणार आहेत,” अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी विधिमंडळाबाहेर एका प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा : “२६ मार्चपर्यंत माफी मागावी, अन्यथा…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवरून दादा भुसेंचा इशारा; शरद पवारांचाही केला उल्लेख!

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी गोंधळ घातला, याबद्दल विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “सत्ता नसली की शेतकरी आठवतो. सत्ता असली की धनाढ्य लोकांबरोबर यांची मैत्री होते. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना मदत भेटली पाहिजे, यात दुमत नाही. लवकर आणि चांगल्या पद्धतीने मदत दिली पाहिजे. परंतु, किती नाटक करणार, विरोधात असल्यावर शेतकरी आठवला, सत्तेत होता तेव्हा दादांना शेतकरी आठवला नाही,” असा टोला बच्चू कडूंनी अजित पवारांना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bacchu kadu on loksabha with maharashtra assembly election ssa