२३ ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार की यामुळे एकतर माझी अंतयात्रा निघणार किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजयीयात्रा निघणार, अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरांगे पाटलांनी टोकाची भूमिका घेऊ नये. सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, असं बच्च कडूंनी म्हटलं.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “मराठा आरक्षण देण्याचा शासन निर्णय झाला. पण, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण अडकलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठ्यांना आरक्षण भेटेल.”
हेही वाचा : “मनोज जरांगेंची मागणी अयोग्य”; भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान, म्हणाले, “फडणवीसांच्या काळात…”
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, अशी जरांगे पाटलांनी मागणी आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बच्चू कडूंनी म्हटलं, “देशात एक हजार जाती आहेत. हजार जातीत शेतकरी आणि मजूर हे वर्ग मोठे आहेत. शेतीला भाव न मिळाल्यानं आरक्षण मागण्याची वेळ आली आहे. शेतीला भाव मिळाला असता, तर कुणी नोकरी मागितली नसती. सर्व सरकारे अपयशी ठरले आहेत. कुठलंही सरकार शेतील भाव देऊ शकले नाही.”
हेही वाचा : “पॉलिटिकल बॉसेससाठी लॉयल राहणं हे…”, गुणरत्न सदावर्तेंचं मनोज जरांगे पाटील यांना उत्तर
“जाती-जातींमध्ये आरक्षणाशिवाय पर्यायच दिसत नाही. नोकरीशिवाय रोजगाराची दुसरी संधीच नाही. सर्व सरकारच्या अपयशाचे हे परिणाम दिसत आहेत. मी मराठा होतो कुणबी झालो. मराठा ही पदवी आहे. १० टक्के आरक्षण वाढवून मराठ्यांना ओबीसीत घ्या,” असेही बच्चू कडू म्हणाले.