मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागण्यासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. पण, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास राज्य सरकार अनुकूल दिसत नाही. यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारला खडसावलं आहे.

“मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील आहेत? मराठ्यांचा आरक्षणावर अधिकार नाही का?” अशा प्रश्नांची सरबत्ती बच्चू कडूंनी सरकारला केली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.

Prasad Khandekar
“अमेरिकेत…” प्रसाद खांडेकरने सांगितला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या नावाचा विनोदी किस्सा; म्हणाला, “नमा मला एक चिक्की…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Raghav Chadha Delhi Election Result 2025
Raghav Chadha : ‘आप’चं संस्थान खालसा होत असताना राघव चढ्ढा कुठे होते? अनुपस्थितीत असल्याने चर्चांना उधाण
the diplomat teaser release date john abraham
“ये पाकिस्तान है बेटा”! The Diplomat चा दमदार टीझर प्रदर्शित, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही दिसली झलक
opposition creates uproar in parliament over us alleged mistreatment of indian deportees
बेड्यां’वरून रणकंदन; आक्रमक विरोधकांमुळे संसदेत सरकारची कोंडी, अमेरिकेच्या प्रक्रियेचा भाग’; जयशंकर यांचे उत्तर
S Jaishankar On Deportation
S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”
supreme court on illegal foreign nationals in India
मुहूर्ताची वाट पाहता का?’ सर्वोच्च न्यायालयाकडून आसाम सरकारची कानउघाडणी
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’

बच्चू कडू म्हणाले, “देशात ओबीसींचा वाटा जास्त आहे. पण, ओबीसींना मिळालेलं आरक्षण कमी आहे. २७ टक्क्यांच्यावर ओबीसींना आरक्षण नाही. ओबीसी आरक्षणात वाढ करून त्यात अ,ब,क,ड असे वर्ग करा. मराठा समाजाला ओबीसीमधून थेट आरक्षण नाही म्हणणं, हे चुकीचं आहे.”

हेही वाचा : “मराठ्यांनी ठरवलं तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

“मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहे? पाकिस्तान की अमेरिकेतील आहेत का? मराठ्यांना आरक्षणाचा अधिकार नाही का? मराठ्यांचं मागासलेपण सरकारला माहिती नाही. मग, मराठ्यांना आरक्षण का नाकारता?” असा प्रश्न बच्चू कडूंनी सरकारला विचारला आहे.

हेही वाचा : “न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नाही”, जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले, “शहाणे असाल, तर…”

“महाराष्ट्रात वाढत चाललेला भेदभाव चुकीचा आहे. राज्यात सगळीकडे मराठा-कुणबी आहेत. फक्त मराठवाड्यात ‘मराठा’ लिहिल्यानं चालत नाही. संत तुकाराम महाराजांनी स्वत: सांगितलं की, ‘बरे झाले देवा कुणबी झालो’. ते मोरे ‘मराठा’ लिहितात. इतकं स्पष्ट असताना आरक्षण नाकारणं म्हणजे जाणीवपूर्वक पळवाट काढल्यासारखं आहे,” अशी टीकाही बच्चू कडूंनी सरकारवर केली आहे.

“ज्यांनी मोगलांच्या तलवारी छातीवर घेतल्या. त्यांच्याच छातीवर सरकार तलवारी चालवत असेल, तर तुमची तुलना मोगलांबरोबर करण्याची वेळ येऊ नये,” असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे.

Story img Loader