शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता होती. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे सरकारमधील आमदारांत नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. यावर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आमच्या सरकारचा कार्यकाळ सात ते आठ महिने उरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची मानसिकता सरकारची नाही. म्हणून मला वाटतं, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापेक्षा ‘जैसे थे’ स्थितीत सरकार चालवणं योग्य आहे.”

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Constituent parties Shiv Sena and NCP in Mahayuti in Vasai are upset
वसईतील महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष नाराज
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

हेही वाचा : देशात आणि राज्यात विरोधकांची एकजूट कायम राहील!; उद्धव ठाकरे यांना ठाम विश्वास, भाजपबरोबर जाण्याची शक्यता फेटाळली

“सध्या अडचण पालकमंत्र्यांची आहे. एका जिल्ह्याला एक पालकमंत्री असेल तर त्या जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावायला सोपं जातं. पण एकाच व्यक्तीकडे ८-९ जिल्हे असल्याने लोकांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. हे मात्र खरं आहे,” असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

शिंदे गटातील अनेक आमदार अयोध्या दौऱ्यावर गेले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या गटात अस्वस्थता आहे, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याबद्दल विचारले असता बच्चू कडूंनी म्हटले, “प्रभू श्री रामचंद्राबद्दल आमच्या मनात प्रचंड आस्था आहे. मला अयोध्येला जाण्याची इच्छा होती. पण, मार्केट समितीच्या निवडणुका असल्याने त्याची आखणी करत होतो. तसेच, रोगनिदान शिबिरही असल्याने अयोध्येला जात आले नाही.”

हेही वाचा : अदानी घोटाळय़ातील सत्य बाहेर येण्यासाठी ‘जेपीसी’ हेच प्रभावी अस्त्र; पृथ्वीराज चव्हाण यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर

“मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने नाराजी असण्याचे कारण नाहीच. २०२४ नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता आहे, इथेपर्यंत ठिक आहे. पण, बंडखोरी होईल, अशी अस्वस्थता नाही. आमच्यातही कधी नाराजीचा सूर येतो, पण कालांतराने जातो,” असे बच्चू कडू म्हणाले आहेत.