शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान, या निकालानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही या निकालानंतर प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे आता केवळ मुख्यमंत्री नाही, तर शिवसेनाप्रमुखही झाले आहेत, असं ते म्हणाले. तसेच या निकालावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं.
हेही वाचा – “…ही भाजपाच्या अंताची सुरुवात”, शिंदे गटाला चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर संजय राऊतांचा घणाघात
काय म्हणाले बच्चू कडू?
“निवडणूक आयोगाने जो निकाल दिला, त्याचं अभिनंदन करतो. हा परीक्षेपूर्वी केलेला अभ्यास आहे. सर्व प्रक्रिया एकदम कायदेशीरपणे करण्यात आली. या निकालाने सिद्ध केलं, की पक्ष हा एका घराण्यापुरता मर्यादेत नसून ज्याच्या पाठीशी कार्यकर्ते असतात, त्याचा पक्ष असतो. आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संख्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आहे. त्यामुळे केवळ नावाने ठाकरे असल्याने पक्ष आपल्याकडे आहे, हा गैरसमज आता दूर झाला आहे
“एकनाथ शिंदे आता शिवसेना प्रमुख”
“निवडणूक आयोगाने जो निकाल दिला, त्याचं अभिनंदन करतो. हा परीक्षेपूर्वी केलेला अभ्यास आहे. सर्व प्रक्रिया एकदम कायदेशीरपणे करण्यात आली. या निकालाने सिद्ध केलं, की पक्ष हा एका घराण्यापूरता मर्यादेत नसून ज्याच्या पाठिशी कार्यकर्ते असतात, त्याचा पक्ष असतो. आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संख्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आहे. त्यामुळे केवळ नावाने ठाकरे असल्याने पक्ष आपल्याकडे आहे, हा गैरसमज आता दूर झाला आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
“एकनाथ शिंदे आता शिवसेना प्रमुख”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीच नाही, तर शिवसेना प्रमुखही झाले आहेत. त्यांनी एक नवीन इतिहास रचला आहे. क्रांती आणि बंड भारताच्या इतिहासात आहे. ज्यांनी-ज्यांनी बंड जनतेसाठी केलं, त्यांच्या पाठिशी कायदा उभा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे”, असंही ते म्हणाले.