बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बच्चू कडू यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करणार म्हटले होते. दरम्यान, आज बच्चू कडू यांनी अमरावतीत आयोजित मेळाव्यात भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केले.

हेही वाचा – ‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरे गटाकडून टीका, म्हणाले “अर्थात, म्हणजे…”

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

“प्रहार काही आंडू पांडूचा पक्ष नाही, आम्ही संख्येने कमी असलो तरी बाजी आहोत. आम्ही कोणाच्या वाटाल्या जात नाही आणि कोणी वाट्याला गेलं तर त्याचा कोथळा काढल्या शिवाय राहत नाही. विनाकारणा तोंड माराल, तर आम्ही तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही, सत्तेची आम्हाला परवा नाही. मी २० वर्ष ३५० गुन्हे घेऊन प्रवास केला आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

हेही वाचा – शिवसेनेतील फूट प्रकरणावर २९ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात…

“मी जेव्हा निवडणुकीला बाहेर पडलो, तेव्हा कोणत्या बिल्डराच्या घरी गेलो नाही. आम्ही मंदिर, मशीद, धर्म, जातीचं राजकारण केलं नाही. गोरगरीब, अपंगांसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं, त्यांचा कधी राजकारणासाठी वापर केला नाही. राजकारण आणि तत्त्वांची सांगड घालता आली पाहिजे”, असेही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना खुले आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या…”

“आम्ही छोटा पक्ष असलो, तरी दिलदार आहोत. नाव बच्चू असलं आणि आडनाव कडू असलं तर मी गोड आहे. कितीही खाल्लं तर मधूमेह होत नाही. आज सर्वच पक्षात बंडखोर आहेत. जे बंडखोर आहेत, तेच पहिल्या रांगेत आहेत. जेवढी प्रसिद्धी मला मीडियाने गेल्या काही दिवसांत दिली, तेवढी मला शेतकरी आंदोलनादरम्यान दिली असती, तर पाच-सहा मागण्या मी पूर्ण करून दाखवल्या असत्या”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – VIDEO: जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचं भाषण सुरू असताना अजान सुरू झालं अन्…

दरम्यान, यावेळी त्यांनी रवी राणा यांच्याशी सुरू असलेल्या वादावरही भूमिका स्षष्ट केली. “ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो. पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही”, असा इशारा त्यांनी रवी राणा यांना दिला. तसेच राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा विषय माझ्यासाठीही संपला असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader