प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू यांनी महायुतीत बंडखोरी करत अमरावतीत भाजपाच्या नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार न देता केवळ अमरावतीत उमेदवार दिल्याने, बच्चू कडू हे महायुतीबरोबर आहेत विरोधात? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, यासंदर्भात आता बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच त्यांनी अमरावतीत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब कोणत्याही परिस्थिती निवडून येतील, अशा विश्वासदेखील व्यक्त केला आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

“अमरावतीत आम्ही महायुतीच्या विरोधात लढतो आहे. आम्ही एकप्रकारे बंड केलं आहे. त्यामुळे आता आम्हाला महायुतीत ठेवायचं की नाही, हा त्यांच्या नेत्यांचा प्रश्न आहे. ते जो निर्णय घेतली, आम्ही त्याचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच आमचं बंड हे केवळ अमरावतीपूरतं मर्यादित आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केलं.

AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Shivraj Rakshe
Shivraj Rakshe : “…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांची तुफान टोलेबाजी, “उद्धव ठाकरेंचे नेते कोण? राहुल गांधी, आता मुंबईक…

नवनीत राणांना नेमका विरोध का? बच्चू कडू म्हणाले…

पुढे बोलताना त्यांनी नवनीत राणा यांना नेमका विरोध का आहे? यासंदर्भातील प्रतिक्रिया दिली. “राणा दाम्पत्याला विरोध करण्यामागे दोन तीन कारणं आहेत. एक म्हणजे रवी राणा हे नेहमी मारण्याची भाषा करतात. धमक्या देतात. त्यांनी मलादेखील घरी येऊन मारण्याची धमकी दिली होती. अमरावती जिल्ह्याचं वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न सातत्याने रवी राणा यांच्याकडून केला जातो. याशिवाय नवनीत राणा या पाच वर्ष खासदार होत्या. मात्र, पाच वर्षात त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. या जिल्ह्याला खासदार आहे की नाही हेच जनतेला माहिती नव्हते. कारण त्या अमरावतीत कधी दिसल्या नाहीत. त्यामुळे अमरावतीच्या जनतेमध्ये त्यांच्या विरोध रोष होता आणि जनतेने त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याची मागणी केली होती”, असे ते म्हणाले.

“कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही”

“दिनेश बुब यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून संपर्क करण्यात आला का? असे विचारलं असता, त्यांच्याकडून कोणताही संपर्क साधण्यात आला नाही”, असे बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच “आता निवडणुकीतून माघार घेण्याची वेळ गेली आहे. साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी आम्ही उमेदवारी मागे घेणार नाही”, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर, “घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा ते…

“..तर आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा”

देवेंद्र फडणवीस यांनी केवळ मोदींसाठी नवनीत राणा यांना निवडून द्या, असे आवाहन केले होते. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “भाजपा आणि त्यांच्या सहयोगी पक्षासाठी मोदी महत्त्वाचे असतील तर आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे. देशातील गरीब जनता महत्त्वाची आहे. देशातील बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पेपर फुटीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत.”

दरम्यान, यावेळी बोलताना अमरावतीत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच दिनेश बुब एक सच्चा कार्यकर्ता आहे. एक रक्तदाता आणि एक समाजसेवक आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader