शिवसेनेतील शिंदे गटाने मविआ सरकारमधील अर्थमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप करत बंडखोरी केली. मात्र, आता त्यांना पुन्हा ज्यांच्यावर आरोप केले त्याच अजित पवार यांच्याबरोबर सत्तेचं वाटप करावं लागत आहे. अशातच अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर बोलताना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांना मिळणारं मंत्रीपद आणि आमदारांची नाराजी यावर प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बच्चू कडू म्हणाले, “खातेवाटपामध्ये काही गोष्टींमध्ये किंतू परंतू असू शकतो. प्रत्येकाला वाटतं की, अजित पवारांकडे अर्थखातं जायला नको. मागच्यावेळी अजित पवारांनी जो कारनामा केला, तर ते यावेळी होऊ नये अशी अपेक्षा आहे. तसं पुन्हा यावेळी होईल की काय अशी आमदारांना भीती आहे.”

“चार-पाच आमदार मलाही म्हणाले की, अजित पवारांकडे…”

“प्रत्येक आमदाराला असं वाटतं आणि त्यातील चार-पाच आमदार मलाही म्हणाले की, अजित पवारांकडे पुन्हा अर्थ खातं गेलं, तर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी देणे, इतरांना कमी देणे हाच प्रकार करतील. म्हणून सर्वांना वाटतं की, अर्थखातं अजित पवारांना देऊ नये,” असा दावा बच्चू कडूंनी केला.

हेही वाचा : “मुंबईत राहिलं तर मंत्रीपद मिळतं आणि गावी राहिलं तर…”, बच्चू कडूंचं मंत्रीमंडळ विस्तारावर वक्तव्य

“आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथं आला”

“आमदारांची नाराजी दूर करणं हे सरकारपुढे मोठं आव्हान आहे. कारण तिसरा पक्ष सरकारमध्ये आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदं गेली आहेत. त्यामुळे आधीच अपेक्षा असलेल्यांना वाटतं की, आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथं आला. त्यामुळे आपली संधी जाते की काय अशी नाराजी असणारच आहे,” असंही बच्चू कडूंनी नमुद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu big statement about ajit pawar as finance minister pbs
Show comments