एकनाथ शिंदे गटासोबत जाण्यासाठी अपक्ष आमदार बच्चू कडूंनी ५० खोके घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार रवी राणांनी केला. यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला. त्यामुळे या वादात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. मात्र, या मध्यस्थीनंतरही रवी राणांनी घरात घुसून मारण्याची भाषा वापरल्याने या वादात पुन्हा ठिणगी पडली. शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी करूनही राणांनी असं वक्तव्य का केलं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बच्चू कडू म्हणाले, “राणांनी काल दोन वक्तव्यं केली. रवी राणा तीन वाजता म्हणाले की, बच्चू कडूंनी आभार मानले, आता आमचा वाद मिटला आहे. मात्र, माध्यमं ते वक्तव्य सांगत नाहीत, तर जोडे मारायचं वक्तव्य सांगत आहेत.”

Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?

“गोंधळात आणखी गोंधळ निर्माण करू नये असं मी ठरवलं आहे”

“आम्ही सभा घेतली आणि राणाजींचे आभार मानले. ते काल तीन वाजता म्हणाले की, बच्चू कडूंनी आभार मानले, आता वाद मिटला. नंतर सायंकाळी सहा वाजता म्हणाले की, घरात घुसून मारेन. आज पुन्हा म्हणत आहेत की वाद मिटला. यामुळे गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे या गोंधळात आणखी गोंधळ निर्माण करू नये असं मी ठरवलं आहे,” असं बच्चू कडूंनी म्हटलं.

“५० खोके घेऊन आला असं म्हणत माझा अपमान केला”

बच्चू कडू म्हणाले, “माझ्या आणि त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला तर माध्यमांमध्येही गोंधळ निर्माण होतो, राज्यातही गोंधळ निर्माण होतो. त्यांनी बच्चू कडू गुवाहाटीला गेला आणि ५० खोके घेऊन आला असं म्हणत माझा अपमान केला. ते चुकीचं आहे. सत्ता परिवर्तन आत्ताच झालं का? इतिहास पाहिला तर अशा अनेक घटना घडल्या.”

“हा वाद आणखी पेटवायचा नाही”

“रवी राणा आणि नवनीत राणा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. मग आम्ही म्हणायचं का की त्यांनी पैसे घेतले? हा वाद आणखी पेटवायचा नाही. माध्यमं वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मी पेटवणार नाही. आज रात्रीच राणांना भेटणार, त्यावेळी माध्यमांनाही बोलावणार आहे. आम्ही दोघे भेटून एकाच पंगतीत जेवायला बसू,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.

“स्वतः फडणवीसांनी मला फोन करून सांगितलं की…”

मुख्यमंत्र्यांना भेटून काय सांगणार या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघातील २० हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येईल अशा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून सांगितलं की, आज तुम्हाला एक चांगलं गिफ्ट देणार आहे. एका महिन्यात माझ्या मतदारसंघातील माझा शेतकरी सुखावणार आहे.”

हेही वाचा : ‘तुम्ही बच्चू कडूंना घरात घुसून मारेन का म्हणालात?’ रवी राणांनी दिलं उत्तर, म्हणाले “जर तलवारीने कोथळा काढत…”

“वादानंतर असे फायदे झाले तर भांडायला काय हरकत”

“माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळणार, त्याच्या शेतात पिक उभं राहणार यापेक्षा अधिक आनंदांची गोष्ट काय असणार आहे. वादानंतर असे फायदे झाले तर भांडायला काय हरकत आहे. फक्त इतक्या खालच्या स्तरावर आरोप जायला नको,” असंही कडूंनी नमूद केलं.