उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ मंत्र्यांचा रविवारी शपथविधी पार पडला. अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिंदे गट, भाजपा व अपक्ष आमदारांच्या अपेक्षांवर विरजण पडल्याचं चित्र राज्यात निर्माण झालं आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा एकीकडे असताना दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांमध्येही नाराजी असल्याचं दिसून येत आहे. बच्चू कडूंनी आपली नाराजी माध्यमांकडे बोलून दाखवली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्तार लवकर करावा अशी मागणी बच्चू कडू करत आहेत. मात्र, मंत्रीमंडळ विस्ताराऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ९ आमदारांचा शपथविधी पार पडला. शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे नाराज असल्याच्या चर्चांवर बच्चू कडूंना माध्यमांनी विचारणा करता त्यावर कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

“अजित पवारांना भुरळ पडली”

“नाराज व्हायचं कारण नाही. कारण खोके म्हणणारे आता ओके झालेत. सरकार चांगलं झालं. स्वागतच आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या वेगवान विकासाची भुरळ अजित पवारांना पडली. त्यामुळे विकासात आपण मागे राहू नये यासाठी ते सरकारमध्ये सामील झाले, उपमुख्यमंत्री झाले. त्यांचं अभिनंदनच आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

“जे शेवट आले, त्यांना आधी जेवण मिळालं आणि आधी आलेल्यांना आता शेवट जेवण मिळणार काय माहीत. नाराज कुणी असेल तर माहीत नाही, पण आता नाराजी करून काही होणार नाही. फक्त त्यांना नाराज करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे”, असं बच्चू कडूंनी यावेळी नमूद केलं.

“आपलेच दात आणि आपलेच ओठ”, शिंदे गटाच्या नाराजीच्या चर्चांवर बच्चू कडूंचं वक्तव्य; म्हणाले, “आता कोणासमोर…”

दरम्यान, याआधीही बच्चू कडूंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. “नाराजीचा सूर असला तरी तो दाखवता येत नाही. आपलेच ओठ, आपलेच दात आणि आपलीच जीभ आहे. आता कोणासमोर बोंबलावं अशी स्थिती आहे. आता काढला ना रस्ता, आता त्या रस्त्यावर काटे आहेत, वाटेत धरणं आहेत त्याला काही अर्थ नाही”, अशी भूमिका बच्चू कडूंनी मांडली याआधी मांडली आहे.

Story img Loader