राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत. अजित पवार निधी देत नव्हते, म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असा दावा शिंदे गटातील आमदारांनी केला होता. आता अजित पवारच सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाली आहे.
अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. विविध गटांना सरकारमध्ये सामील केल्यास आपल्या पक्षाची ताकद वाढत आहे, असं काही लोकांना वाटत असेल. पण यामुळे भाजपाच अधिक गोत्यात जाणार आहे, हे मात्र खरं आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- मोठी अपडेट: महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान
मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, “आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला होता. हा मंत्रीमंडळ विस्तार का लांबवला होता? याचं कारण आम्हाला आता कळालं. राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घ्यायचं होतं, त्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार लांबवला. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर लगेच त्यांच्या गटाच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला. आधी आलेले बिचारे (शिंदे गटाचे आमदार) परिणामाची चिंता न करता आले होते. त्यांचाही शपथविधी घ्यायला पाहिजे होता. ही जी भूमिका आहे, यामुळे काही लोकांना वाटत असेल की आपला पक्ष मोठा होईल, पण यामुळे ते (भाजपा) गोत्यात जाणार, हे मात्र खरं आहे.”
हेही वाचा-दिल्लीतील बैठकीनंतर शरद पवार ‘ॲक्शन मोड’वर, अध्यक्ष पदाबाबत केलं मोठं वक्तव्य
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दहा वेगवेगळे अपक्ष आमदार आहेत, तुम्ही वेगळा निर्णय घेणार आहात का? यावर बच्चू कडू म्हणाले, “निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला का सांगू? आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेऊ”