राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते व अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवारांनी छगन भुजबळांना शांत करावं, अन्यथा मी शांत बसणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यावर आता प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं आहे.

अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भूमिका एकच आहे. वरिष्ठांच्या सहमतीशिवाय भुजबळ अशाप्रकारे आक्रमक बोलत नाहीत, हे स्पष्ट आहे, अशा आशयाचं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “तेच माझंही मत”, छगन भुजबळांच्या ओबीसींबाबतच्या भूमिकेला भाजपा नेत्याचं समर्थन

सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचं नेतृत्व छगन भुजबळ करतायत, या बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता बच्चू कडू पुढे म्हणाले, “भाजपा आणि काँग्रेसही ओबीसींचं नेतृत्व करू पाहत आहे. पण भाजपा आणि काँग्रेसवर छगन भुजबळ भारी पडत आहेत. भुजबळांनी या दोघांनाही मागे टाकलं आहे. आता ना भाजपा ना काँग्रेस, आता फक्त भुजबळसाहेब हेच ओबीसीचे नेते आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu on chhagan bhujbal and ajit pawar stand on maratha reservation rmm