Bachchu Kadu : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडलं. या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे. त्यामुळे या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार येणार? महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार? याबाबत आता अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. दरम्यान, मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले.

यामध्ये काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात अपक्ष आणि छोटे पक्ष महत्वाचे ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता निकालाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्याआधीच राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. विधानसभेच्या निकालाआधीच आमदार बच्चू कडू यांनीही सरकार स्थापनेबाबात मोठा दावा केला आहे. “आमचं सरकार येईल. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार बनेल आणि मोठ्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
NCP Ajit Pawar group
Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”

हेही वाचा : Axis My India Exit Poll 2024 : अॅक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये भाजपा-महायुतीला १७८ जागांचा अंदाज, मविआला किती जागा?

बच्चू कडू काय म्हणाले?

“जवळपास एक महिना निवडणुकीच्या धावपळीत गेला. आम्ही १२ ही महिने काम करत असतो. मात्र, लोकांच्या कामांसाठी पळणं आणि निवडणुकीसाठी काम करणं वेगळं असतं. आम्ही या मतदारसंघात नक्की निवडून येऊ असा विश्वास आहे. मात्र, आम्हाला दोन्हीही राष्ट्रीय पक्ष पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. ते जिंकण्यासाठी प्रयत्न करत नव्हते. त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम होता. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात १२२ पैकी महाशक्तीच्या २५ ते ३० जागा टॉप लढतीत आहेत. त्यामध्ये आमच्या १० जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

“सरकारच आमचं येईल. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार बनेल. मोठ्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ. तशा पद्धतीची चर्चा सुरु आहे. आमच्याशिवाय कोणतंही सरकार सत्तेत येणार नाही. महाविकास आघाडीला किंवा महायुतीला पाठिंबा देण्यापेक्षा आपणच सरकार बनवू आणि त्यांचा बाहेरून पाठिंबा घेऊ, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोणत्याही पक्षाचं किंवा आघाडी आणि युतीच्या जागाचा आकडा बहुमतापर्यंत जात शकत नाही असं दिसत आहे. त्यामुळे आम्ही असल्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.