Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll Results Bachchu Kadu : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया संपल्यावर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. येत्या २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या प्रमुख १० पैकी सहा एक्झिट पोल्सनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. तर तीन एक्झिट पोल महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. एका एक्झिट पोलमधून अंदाज वर्तवण्यात आला आहे की राज्यात त्रिशंकू परिस्थिती होईल. या निवडणुकीत नेमकं काय होईल ते शनिवारी (२३ नोव्हेंबर) स्पष्ट होईल. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांना विश्वास आहे. की राज्यात त्यांचच सरकार येईल. अशातच काही महिन्यांपूर्वीपर्यंत महायुती सरकारमध्ये असलेल्या, भाजपा-शिवसेनेच्या (शिंदे) मित्रपक्षाने मात्र आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असा दावा केला आहे. प्रहार जनशक्ती पार्टी असं या पक्षाचं नाव असून या पक्षाचे प्रमुख तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा