अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपाने याच मतदारसघातून लोकसभेचे तिकीट दिलं आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात अधिकृतपणे प्रवेशदेखील केला. मात्र, नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध दर्शवला आहे. “नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती हा पक्ष एनडीएतील (महाराष्ट्रात महायुती) घटकपक्ष आहे. या घटकपक्षाच्या विरोधाला न जुमानता भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे बच्चू कडू यांच्या पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. अमरावतीत आमची भाजपाच्या उमेदवाराशी मैत्रीपूर्ण लढत असेल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. पाठोपाठ बच्चू कडू आता अमरावतीत नवनीत राणांविरोधात प्रचार करू लागले आहेत.

बच्चू कडू यांनी नुकत्याच एका प्रचारसभेत केलेल्या भाषणात दावा केला आहे की, खासदार नवनीत राणा यांनी मतदारसंघातील मतदारांना १७ रुपये किंमतीच्या साड्या वाटल्या. परंतु, या साड्यांमुळे येथील लोकांचं मतपरिवर्तन होणार नाही.

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
Bhimrao Dhonde On Vidhan Sabha Election 2024
Bhimrao Dhonde : भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे चक्क स्वतःचं चिन्ह विसरले; भर सभेत म्हणाले ‘तुतारी’ वाजवा; नेमकं काय घडलं?
genelia and riteish deshmukh invited suraj chavan to their home
रितेश भाऊ अन् जिनिलीया वहिनींकडून खास निमंत्रण! सूरज चव्हाण देशमुखांच्या घरी केव्हा जाणार? म्हणाला, “ते देवमाणूस…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Fandry Fame Somnath Awaghade And Rajeshwari Kharat
गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा अन्…; ‘फँड्री’तील जब्या-शालूचा नवा फोटो चर्चेत; नेटकरी म्हणाले, “खरंच लग्न झालं का…”

अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले, पैसा आईची सेवा करू शकत नाही. त्यासाठी चांगलं अंतर्मन तयार झालं पाहिजे, चांगले विचार पाहिजेत. त्यांनी (नवनीत कौर राणा) १७ रुपयांची साडी देऊन या मेळघाटची बेईज्जती करून टाकली. दोन कोटी रुपयांच्या कारने फिरायचं आणि १७ रुपयांची साडी देऊन लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची. परंतु, मी सर्वांना आवाहन करतो की आपल्याला ही व्यवस्था तोडून टाकावी लागेल. त्यासाठी बलिदान द्यावं लागलं तरी चालेल.

हे ही वाचा >> यवतमाळ : लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने पोतं भरून आणली चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत झालेल्या निर्णयांबाबत आमदार बच्चू कडू म्हणाले, आम्हाला काहींचा निरोप होता की तटस्थ राहायचं, न इधर, ना उधर… परंतु, मला सांगायचं आहे की, निवडणुकीच्या वेळी वाटलेली १७ रुपयांची साडी लोकांचं मतपरिवर्तन करू शकत नाही. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महारांजांचा इतिहास आहे. आपल्या छत्रपतींनी अनेक आव्हानं तोडून, मोडून परतवून लावली होती. हा संत गाडगेबाबांचा जिल्हा आहे. इथले लोक १७ रुपयांच्या साडीमुळे गुलामीकडे जाणार नाहीत.