लोकसभा निवडणूक आता एक वर्षावर आहे. त्यामुळे देभभरातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनीही लोकसभेची तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या (शिवसेना-ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस) बैठकांना वेग आला आहे. महाविकास आघाडीतल्या पक्षांनी जागावाटपावर चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातही भाजपा, शिंदे गटासह त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे.

शिवसेनेचा शिंदे गट लोकसभेच्या २२ जागांसाठी अग्रही असल्याचं बोललं जात आहे. अशातच भाजपा-शिंदे गटाचा मित्रपक्ष असलेला प्रहार जनशक्ती पक्ष लोकसभेच्या एका जागेसह महाराष्ट्रभर विधानसभेच्या १५ ते २० जागांसाठी अग्रही असल्याची माहिती मिळत आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : “मग मला निवडणूक लढायला सांगायचं नव्हतं ना?”, छगन भुजबळांचा थेट अजित पवारांना सवाल
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा? (फोटो सौजन्य @इंडियन एक्स्प्रेस)
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?
Pratap Sarangi and Mukesh Rajput
BJP MP Pratap Sarangi : राहुल गांधींनी ‘धक्का’ दिल्याचा आरोप करणारे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत कोण आहेत? जाणून घ्या!
Rahul Narwekar On Uddhav Thackeray
Rahul Narwekar : उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय चर्चा झाली? विरोधी पक्षनेतेपदाबाबत काही ठरलं का? राहुल नार्वेकरांचं मोठं भाष्य

बच्चू कडू म्हणाले, आम्ही आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलोय. काल आमची एक बैठक पार पडली. त्यानंतर आता आम्ही विधानसभेच्या १५ ते २० जागा लढवणार आहोत. तर शक्य झाल्यास लोकसभेची एक जागा लढवण्याची आमची तयारी आहे. आम्ही सगळे पक्ष जे सत्तेत आहोत, त्यात भाजपा असेल, शिंदे गट असेल या सर्वांशी चर्चा करू. घटकपक्ष म्हणून या सगळ्याला कशा पद्धतीने सामोरं जाता येईल त्याची तयारी सुरू आहे.

आगामी निवडणुका तुम्ही भाजपा आणि शिंदे गटाबरोबर लढणार आहात का असा प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, सध्या तरी तशी परिस्थिती आहे. आमही एकत्र लढण्याची तयारी आहे. आमची युती नाही झाली तरी आमची तयारी आहे.

बच्चू कडू म्हणाले, लोकसभेला आम्ही अमरावती जागेसाठी अग्रही आहोत. विधानसभेला अमरावतीतल्या अचलपूरसह आणखी एक जागा. अकोल्यातल्या दोन, वाशिममधील एक, नागपुरातली एक, नाशिक, सोलापूर अशा संपूर्ण महाराष्ट्रात १५ ते २० जागा लढण्याची आमची तयारी आहे.

हे ही वाचा >> “भाजपाच्या सर्वेनुसार शिंदे गटातला एकही खासदार…”, चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा; म्हणाले, “गजानन कीर्तिकरांना समजलंय…”

बच्चू कडू म्हणाले, आमची अमरावती लोकसभा लढवण्याची ताकद आहे. मी स्वतः याआधी या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढलो आहे. कोणाच्याही पाठिंब्याशिवाय मी तेव्हा लढलेलो. तेव्हा केवळ ५ हजार मतांनी मी पराभूत झालो होतो.

Story img Loader