अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपाने याच मतदारसघातून लोकसभेचे तिकीट दिलं आहे. भाजपाची लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर झाली असून या यादीत नवनीत राणा यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात अधिकृतपणे प्रवेशदेखील केला. मात्र, नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध दर्शवला आहे. “नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती हा पक्ष एनडीएतील घटकपक्ष आहे. या घटकपक्षाच्या विरोधाला न जुमानता भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे बच्चू कडू यांच्या पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. अमरावतीत आमची भाजपाच्या उमेदवाराशी मैत्रीपूर्ण लढत असेल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, शनिवारी रात्री बच्चू कडू यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मला असं वाटतं की आता अमरावतीचं पोस्टमार्टेम झालेलं आहे. त्यात काही राहिलेलं नाही. आता केवळ निकाल बाकी आहे. या मतदारसंघात आमचाच उमेदवार निवडून येईल. मी आधीच सांगितलं आहे की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे. अमरावती जिल्ह्याबाबतचा पुढचा निर्णय महायुतीने घ्यायचा आहे. आमची लढाई राणांविरोधात आहे युतीविरोधात नाही. आम्ही युतीतून बाहेर पडावं, युतीत राहावं की मैत्रीपूर्ण लढावं हा निर्णय महायुतीकडे असेल. तो चेंडू महायुतीच्या कोर्टात आहे. याबाबत ते लोक घेतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू.

बच्चू कडू म्हणाले, आम्हाला नवनीत राणांचा राग नाही. परंतु, नवनीत राणा यांच्याबद्दल उच्च न्यायालयाने १०० पानांचा निकाल दिला आहे. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, जातप्रमाणपत्राच्या प्रकरणात सगळी बनवाबनवी केली आहे. त्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यापासून ते देशद्रोहापर्यंतचे उल्लेख आहेत. असं असूनही सर्वोच्च न्यायालयाने अडीच वर्षे याप्रकरणी निकाल दिलेला नाही. दुसऱ्या बाजूला न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला चालू असूनही त्यांना उमेदवारी दिली जाते. ही हुकूमशाही असून आमची लढाई ही याच हुकूमशाहीविरोधात आहे.

हे ही वाचा >> भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’बाबत प्रश्न विचारताच पियूष गोयल यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ किस्सा

अचलपूरचे आमदार म्हणाले, रवी राणांचं वागणं अतिशय संताप निर्माण करणारं आहे. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजी आहे. मी एकवेळ स्वतःचा अपमान सहन करेन. परंतु, माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही. आमचे कार्यकर्ते म्हणाले आहेत की, अपमान सहन करण्यापेक्षा आपण युतीबाहेर पडू.