महायुतीतला प्रहार जनशक्ती पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं की, ते महायुतीत लोकसभेच्या अमरावती या जागेसाठी अग्रही आहेत. तसेच त्यांचा पक्ष महाराष्ट्रात विधानसभेच्या १५ ते २० जागा लढेल. तशी त्यांनी तयारी सुरू केली आहे. बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेची मागणी केली असली तरी नवनीत राणा या सध्या अमरावतीच्या खासदार आहेत, ज्या सध्या भाजपवासी आहे. त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढली होती. परंतु निवडून आल्यावर त्यांनी महायुतीत प्रवेश केला आणि भाजपाला पाठिंबा दर्शवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बच्चू कडू अमरावती लोकसभेसाठी अग्रही असल्यामुळे आता महायुतीत अंतर्गत वाद होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, अमरावतीमधल्या बडनेराचे आमदार आणि नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी आता बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा म्हणाले, देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे राज्यात देवेंद्र फडणवीस या पक्षाचे आणि आमचे प्रमुख आहेत. मोदींजीसोबत स्वतः खासदार म्हणून नवनीत राणा यांची चर्चा झाली आहे. मी अमित शाह यांना अनेकदा भेटलोय. महत्त्वाचं म्हणजे आमच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस हे खंबीरपणे उभे आहेत.

आमदार रवी राणा म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी असल्याने कोण कुठली जागा मागतंय आणि कुणाला कुठली जागा द्यायची याबाबतचा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस घेतील. कोणी कितीही दावे केले तरी ते खोडून काढण्याची ताकद या रवी राणामध्ये आहे.” रवी राणा टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> “भाजपाच्या सर्वेनुसार शिंदे गटातला एकही खासदार…”, चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा; म्हणाले, “गजानन कीर्तिकरांना समजलंय…”

दरम्यान राणा दाम्पत्याने आगामी काळात भाजपाकडून लढावं असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता रवी राणा म्हणाले, तो नंतरचा प्रश्न आहे. तसेच काय मागायचं, काय ठेवायचं ते मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन, टीव्ही चॅनेलवर याची चर्चा करण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील.