अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज (५ ऑक्टोबर) निकाल लागला. यात परिवर्तन व सहकार पॅनल आमनेसामने होते. या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा परिवर्तन पॅनलकडून निवडणूक रिंगणात होते. आज मतमोजणी पार पडली यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव केला. बच्चू कडू यांनी दोन मतांनी विजय मिळवला. बच्चू कडू विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी चांगलाच जल्लोष केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विजयावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्यांनी चीड व्यक्त केलीय आणि त्याचाच हा विजय आहे. आम्ही हे दाखवून दिलं की जो शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे मी आभार मानतो.”

भडकलेल्या बच्चू कडूंनी रुग्णालयातील स्वयंपाक्याच्या लगावली कानशिलात

“सावकारकी सोडावी लागेल, सुटाबुटात राहून निवडणूक लढता येणार नाही”

“ज्यांच्याविरोधात आम्ही निवडून आलो त्यांना इतकंच सांगेल की सुटाबुटात राहून निवडणूक लढता येणार नाही. सामान्य माणसापर्यंत जावं लागेल. सावकारकी सोडावी लागेल. त्याशिवाय विजय होणार नाही. आता ही बँक आम्ही शेतकऱ्याच्या दारापर्यंत नेण्याचा प्रयत्न करु,” असंही बच्चू कडू यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu win amravati cooperative bank election 2021 pbs