अलिबाग – मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी सकाळी महामार्गाच्या परिस्थितीची पहाणी केली. दुरुस्ती आणि काँक्रिटीकरणाचाही आढावा घेतला.
गेल्या दोन महिन्यांतील हा रस्त्याच्या कामाचा तिसरा आढावा होता. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या १३ वर्षांपासून रखडले आहे. अनेक प्रयत्न करूनही रस्त्याचे काम मार्गी लागताना दिसत नाही. अशातच गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी भरमसाठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि कोकणातील प्रवाशांचे हाल होत आहेत.
हेही वाचा – केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांच्या मदतीने कोकणात रिफायनरी -फडणवीस
हेही वाचा – ठाकरे गटाचे पैशांवरच लक्ष!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप
ही बाब लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी महामार्गाची पाहणी केली. रस्ते दुरस्तीसाठी सिमेंट बेस ट्रीटमेंट पद्धतीचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी इंदोर येथून यंत्र सामुग्री आणण्यात आली असून आणखीन काही यंत्र दोन दिवसांत दाखल होणार आहेत. या पद्धतीमुळे पावसातही रस्ता दुरुती करणे शक्य होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल आणि डिसेंबर अखेरपर्यंत दोन्ही मर्गिककेचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.