Badlapur Case Deepak Kesarkar Action Against School : बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत घडलेल्या दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेप्रकरणी राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली होती. या समितीने त्यांचा चौकशी अहवाल सादर केला आहे. हा अहवाल शालेय शिक्षणंत्री दीपक केसरकर यांनी आज वाचून दाखवला. यावेळी केसरकर म्हणाले, “या घटनेत सर्वात मोठी चूक ही शाळेतील दोन सेविकांची आहे. त्या जर त्यांच्या कर्तव्यावर हजर असत्या तर हा प्रकार घडलाच नसता. सर्व घटनेची माहिती घेऊन आम्ही त्या दोन सेविकांना सहआरोपी करावं अशी शिफारस केली आहे”.

शाळेतील सेविकांवर (कामिनी काळेकर व निर्मला भुरे) मुलींना शौचालयात नेण्याची व तिथून आणण्याची जबाबदारी होती. मात्र त्या त्यांच्या कामावर हजर नसल्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे शिक्षण विभागाने या दोन सेविकांवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

Crime News In Marathi
Crime News : आतडे फाडले अन् हवेत… आईच्या प्रियकराची भावंडांकडून क्रूर हत्या
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
baba siddique
सिद्दिकी हत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करा,झिशानला माहीत असलेले सत्य बाहेर येईल; अनिल परब
Chhota Rajan gang. session court. Pre-arrest bail ,
विकासकाकडून दहा कोटींची खंडणी मागण्याचे प्रकरण : छोटा राजन टोळीच्या दोघांना सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन
shreya talpade and aloknath fir
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीच्या प्रकरणात आले नाव; काय आहे प्रकरण?
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
Prayagraj monalisa marathi news
उलटा चष्मा : मोनालिसाचे रुदन
Saif ali khan case, Investigation , Saif ali khan house ,
आरोपीला सैफच्या घरी नेऊन तपास

दीपक केसरकर म्हणाले, “कोणाला सहआरोपी करायचं याबाबतचा निर्णय गृह विभाग घेईल. कारण कोणालाही आरोपी करण्यापूर्वी त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. शाळेतील शिक्षिका, मुख्याध्यापिका, सेविका व संस्थेतील पदाधिकारी यामध्ये दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ही घटना १३ ऑगस्ट रोजी घडली होती. १४ ऑगस्ट रोजी मुलीच्या आजी-आजोबांनी वर्गशिक्षिका दिपाली देशपांडे यांच्याकडे तक्रार केली. मात्र, वर्गशिक्षिकेने याबाबत पोलिसांना कळवलं नाही. तसेच १४ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली. मात्र त्यांनी देखील याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही पॉक्सोच्या कलम १९ (२) व २१ (१) अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस आम्ही केली आहे”.

हे ही वाचा >> “शिवाजी महाराजांचा तो पुतळा बदलण्याची मागणी केलेली, पण…”, संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली खंत

शाळेतील १५ दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब

शिक्षणमंत्री म्हणाले, “शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणं आवश्यक आहे. मात्र संबंधित शाळेतील मागील १५ दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. हे रेकॉर्डिंग कसं गायब झालं? याबाबत पोलिसांनी चौकशी करावी, अशी शिफारस देखील आम्ही केली आहे. ही घटना शाळेतील शौचालयाजवळ घडली आहे. नेमकं तिथलं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे”.

हे ही वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”

दरम्यान, दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितलं की ते पीडित मुलींची भेट घेणार आहेत. तसेच केसरकर यांनी दोन्ही मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे.

Story img Loader