Badlapur Case Devendra Fadnavis on Mahavikas Aghadi : बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. मात्र याप्रकरणी शाळा व पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यास दिरंगाई केल्यामुळे बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर सरकारला जाग आली व त्यांनी तातडीने सूत्र हालवण्यास सुरुवात केली. मात्र कारवाईस अनेक दिवस लागल्यामुळे विरोधक राज्य सरकारवर टीका करू लागले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात आज (गुरुवार, २२ ऑगस्ट) महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यातील एकाही मुलीवर, महिलेवर अत्याचार झाला तर ते आपल्यासाठी भूषणावह नाही. मात्र ही गोष्ट विरोधकांना समजली पाहिजे. ते आमच्यावर टीक करत असले, राजीनामे मागत असले तरी त्यांच्या सरकारच्या काळात परिस्थिती बिकट होती. २०२१, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. २०२२ मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या ४,१८० घटना समोर आल्या होत्या. ज्या २०२३ मध्ये कमी झाल्या आहेत. या घटना कमी झाल्या, जास्त झाल्या असं सांगून मी त्यांचं मूल्यमापन करत बसणार नाही. कारण अशी एकही घटना आपल्यासाठी भूषणावह नाही”.

shrinivas pawar and ajit pawar
Shrinivas Pawar : अजित पवारांचा शरद पवारांवर घर फोडल्याचा आरोप? थोरले भाऊ म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Ramdas Athawale
Ramdas Athawale : “महायुतीने आमचा विचार केला नाही”, रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी; मुंबईतील ‘या’ जागेची मागणी!
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला किती जागा मिळणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही..”
MLA Anna Bansode candidature has been announced from Pimpri Assembly Constituency Pimpri
पिंपरी विधानसभा: उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार अण्णा बनसोडे नाराज गटावर म्हणाले “आमच्यात वाद… “
18 against former corporator MLA Anna Bansode Pimpri Assembly Constituency
पिंपरी विधानसभा: १८ माजी नगरसेवक विरोधात गेल्यास अण्णा बनसोडे म्हणाले, अजित पवार जो निर्णय…
Supriya sule and ajit pawar
Supriya Sule : “मला जे अजितदादा आठवतात त्यांना दिल्लीला जाणं आवडत नाही, कारण…”; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
aheri vidhan sabha
‘अहेरी’च्या जागेवरून युती-आघाडीत पेच? आत्राम राजघराण्यात टोकाचा राजकीय संघर्ष

माझ्याकडे तुमच्या सरकारच्या काळातील घटनांचा लेखाजोखा : फडणवीस

फडणवीस म्हणाले, विरोधक संवेदनाहीन होऊन केवळ बोट दाखवत आहेत, राजकारण करत आहेत. मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्या सरकारच्या काळातही अशा घटना झाल्या होत्या. तुम्ही सरकारमध्ये असताना राज्यात काय काय झालं होतं याचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. तो लेखाजोखा मांडून आम्ही कधीच मोठे होणार नाही. कारण आपल्याला समाजातील कीड संपवायची आहे, राजकारण करायचं नाही.

हे ही वाचा >> Badlapur Case : “हा नराधम माणूस म्हणवण्याच्या लायकीचा नाही”, किरण मानेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले, “बदलापूरबाबत थापा मारणारा…”

विरोधकांचा योजना बंद पाडण्याचा प्रयत्न : फडणवीस

राज्याचे गृहमंत्री म्हणाले, विरोधक म्हणत आहेत लाडकी बहीण योजना समाप्त करा आणि आमच्या मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या. मला या विरोधकांना सांगायचं आहे आम्ही मुलींना सुरक्षित ठेवू आणि योजना देखील चालू ठेवू आमच्या योजना बंद पाडण्याचे तुम्ही कितीही मनसुबे आखले तरी आम्ही ते बंद होऊ देणार नाही. हे विरोधक केवळ योजना बंद करण्यासाठी कारणं शोधत आहेत. एखादी योजना कशी बंद होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण यापूर्वी देखील यांना अशा गोष्टी करताना पाहिलं आहे.