Badlapur Crime बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण ( Badlapur Crime ) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्या आरोपीला फाशी द्या अशी मागणी होते आहे. या मागणीसाठी बदलापूरमध्ये मंगळवारी जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या दरम्यान रेल रोकोही करण्यात आला. लोकलसेवा सुमारे ९ तास ठप्प होती. बदलापूरमध्ये जे घडलं त्या प्रकरणाची ( Badlapur Crime ) दखल सरकारने घेतली आहे. मात्र आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. तसंच छोट्या बच्चूवर झालेल्या अन्यायावरुन राजकारण करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे पण वाचा- Badlapur sexual assault : “बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव होता, कारण..”; संजय राऊत यांचा आरोप

नेमकी घटना काय घडली?

बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार ( Badlapur Crime ) झाले. या दोन्ही मुली अत्यंत कोवळ्या वयातल्या आहेत. शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य ( Badlapur Crime ) केलं आहे. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी बदलापूरकर मंगळवारी रस्त्यावर उतरले होते.

बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित

बदलापूरमध्ये सुमारे नऊ तास झालेलं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते म्हणाले की, मंगळवाराच्या आंदोलनामुळे दुर्दैवाने लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. हे व्हायला नको होतं. परंतु मंगळवारी झालेलं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होतं. इतक्या जलदगतीने गाड्या भरून बाहेरून लोक आले. आंदोलकांना मंत्र्यांनी समजावलं, सगळ्या मागण्या मान्य केल्या. तरीही ते माघार घेत नव्हते. त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. राजकारण करायला अनेक मुद्दे आहेत. लहान मुलीचे राजकारण ( Badlapur Crime ) करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना आंदोलनावरुन सुनावलं आहे.

बदलापूर येथील घटनेबाबत बालहक्क समितीने संताप व्यक्त केला आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ उठल्यानेच आंदोलन

मंगळवारच्या आंदोलनात स्थानिक लोक हाताच्या बोटांवर मोजण्याइतके होते. इतर ठिकाणांहून गाड्या भरुन लोक आणण्यात आले होते. मंत्री महोदयांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या तरीही ते हटत नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे. रेल्वे रोको करणं हे मोठं नुकसान आहे. राजकारण करायला अनेक मुद्दे आहेत तिथे राजकारण करु नका. छोट्या बच्चूचं ( Badlapur Crime ) राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते. असे एका दिवसात लाडकी बहीण योजनेचे बोर्ड लगेच छापता येतात का? आमच्या बहिणींना सुरक्षा देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना पाठिशी घालणार नाही. विरोधकांबाबत माझं इतकंच सांगणं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ हा मंगळवारच्या आंदोलनातून दिसला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur crime news eknath shinde said agitation is politically motivated scj