बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला असून याप्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. आरोपी अक्षय शिंदेला नेत असताना मुंब्रा बायपासवर पोलिस आणि अक्षय यांच्यात चकमक झाली. त्यामध्ये, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत एपीआय निलेश मोरे यांनीही गोळी लागली असून त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेनंतर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

असीम सरोदे यांनी पोलिसांच्या कारवाईवर व्यक्त केला संशय

या प्रकरणानंतर ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनीही पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. साधरणत: पोलिसांची बंदूक लॉक असते, मग आरोपी अक्षय शिंदेंनी बंदुकीचा लॉक तोडून पोलिसांवर फायरींग केली का, असा सवालही सरोदे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
Aftab Poonawala, accused of Shraddha Walker's murder and dismemberment.
Lawrence Bishnoi Gang: बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर श्रद्धा वालकरचा मारेकरी; बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याची कबुली
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप

काय म्हटलं आहे असीम सरोदेंनी?

“बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय. आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असतांना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले?, पोलिसांची बंदूक साधरणतः लॉक असते ती आरोपीने कशी वापरली? पोलिसांवर दबाव होता. येथील राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्वाची होती आणि त्याला ठरवून स्वतःला मारून घेण्याची परिस्थिती तयार करून देण्यात आली का? आम्ही ऊच्च न्यायालयाच्या लक्षात उद्याच हा सगळा प्रकार आणून देणार आहोत. शेवटी राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय.” असं असीम सरोदेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Akshay Shinde Encounter : “…म्हणून अक्षय शिंदेचा बळी देण्यात आला”; आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

बदलापूरमध्ये नेमकी काय घटना घडली?

बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?

अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत.