School Male Cleaner Abuse Girls in Badlapur: बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार (Badlapur School Case) झाला. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी आज बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले. सकाळी दहा वाजल्यापासून हे रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू असून यामुळे बदलापूर ते कर्जत लोकलसेवा ठप्प झाली आहे. दरम्यान, आंदोलक क्षणाक्षणाला आक्रमक होत असून आरोपीला आत्ताच भरचौकात फाशी द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एबीपी माझाने काही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.

या प्रकरणात आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरोल म्हणून सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाच चालवण्याचं आश्वासन दिलं. आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं असतं का? इतर राज्यात जे घडतं ते आम्हाला आमच्या राज्यात घडवायचं नाही. त्यामुळे या प्रकरणी आम्ही सरकारला फक्त सात दिवसांची मुदत देतोय. आम्ही सात दिवस इथून हलणार नाहीत, असं एका आंदोलनकर्त्याने म्हटलं.

loksatta editorial on fake court set up in ahmedabad zws
अग्रलेख : भामटे आणि तोतये…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
court denied prearrest bail to thirteen accused in the Sassoon Hospital embezzlement case
ससूनमध्ये चार कोटींचा घोटाळा, तेरा आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Pune Porsche accident, minor driver friend,
पुणे पोर्शे अपघात : अल्पवयीन चालकाच्या मित्राच्या वडिलांनाही अटकपूर्व जामीन नाही
40 students beaten up in municipal school in Sangli news
सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित
Man Sets Up Fake Court In Gujarat
Fake Court Busted In Gujarat: गुजरातमध्ये बनावट न्यायालयाचे पितळ उघड
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार

हेही वाचा >> Badlapur School Case: बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन चिघळले; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक

तर, “आम्हाला आता आमच्या मुलींना बाहेर सोडायची भीती वाटतेय. शाळेत सोडायची भीती वाटते. आम्हाला सुरक्षेची चिंता आहे. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातही नको, सात दिवसांची मुतदही नको. आजच आरोपीला भरचौकात फाशी द्या”, अशी संतप्त प्रतिक्रिया एका महिला आंदोलनकर्त्याने दिली.

रेल्वे स्टेशनवर आंदोलनकर्त्यांनी रेल रोको केल्याने वांगणी ते कर्जत, खोपोली या भागातून ठाणे, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. सकाळी आंदोलन तीव्र झाल्याने बदलापूर पल्ल्याड नागरिकांनी घरातून काम करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे प्रशासनाने अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंत उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू ठेवली होती. तर कर्जत मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची वाहतूक पनवेल मार्ग वळविण्यात आली. दुपारनंतरही हा रेल रोको कायम होता. त्यामुळे काही रेल्वेगाड्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खाकीची भीती उरली नाही – सुप्रिया सुळे

“एखादी घटना घडली तर नुसत्या बदल्या करून प्रकरण (Badlapur Crime) सुटणार नाही. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. जी घटना बदलापूरमध्ये घडली त्याचा मी जाहीर निषेध करते. अशा गोष्टी या फार संवेदनशील पद्धतीने हाताळायच्या असतात. त्यामुळे माध्यमांना आणि सगळ्याच जबाबदार लोकांना विनंती आहे की त्या मुलींची ओळख जाहीर करू नये. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेलं पाहिजे आणि या प्रकरणातल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बलात्कार करणाऱ्याला फाशी झाली तरच असं कृत्य करणाऱ्यांच्या मनात भीती बसेल. आज खाकी वर्दीची भीती उरलेली नाही, असं चित्र दिसतं. पोर्श कार प्रकरण झालं त्यातही काय काय घडलं ते पाहिलं तर कळतं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.