Badlapur Sexual Assault Case Deepak Kesarkar : बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्या (वय चार वर्षे व सहा वर्षे) मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण अलीकडेच समोर आलं आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती गोळा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज (सोमवार, २६ ऑगस्ट) हा अहवाल वाचून दाखवला. केसरकर म्हणाले, “त्या मुलींची वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका व संस्थेतील पदाधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती असूनही त्यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही, तसेच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर पॉक्सो कायद्याच्या (लैंगिक गुन्ह्यांपासून लहान मुलांचं संरक्षण करणारा कायदा) कलम १९ व कलम २१ अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची शिफारस आम्ही केली आहे. पीडित मुलींच्या वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका, शाळेतील दोन सेविका व संस्थेतील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारसही आम्ही केली आहे”.

दीपक केसरकर म्हणाले, “ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथलं गेल्या १५ दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. शाळेतील सेविकांवर (कामिनी काळेकर व निर्मला भुरे) मुलींना शौचालयात नेण्याची व तिथून आणण्याची जबाबदारी होती. मात्र त्या त्यांच्या कामावर हजर नसल्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे या दोन सेविकांना सहआरोपी करण्याची शिफारस चौकशी अहवालाद्वारे करण्यात आली आहे. या मुलींच्या वर्गशिक्षिका व मुख्याध्यापिकेनेही याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. तसेच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी म्हणून उभं करण्याची शिफारस करण्यात आली आहे”.

statue Shivaji Maharaj, Malvan Rajkot fort,
मालवण: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Rajkot Fort Malvan Sindhudurg
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “तो पुतळा बदलण्याची मागणी केलेली, पण…”, संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली खंत
sharad pawar group
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”
Supreme Court Contempt Notice To Maharashtra additional Chief Secretary
Supreme Court : “हे कसले IAS अधिकारी?” सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सुनावलं, नोटीसह बजावली
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…

राज्य सरकार पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार : केसरकर

दरम्यान, दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितलं की ते पीडित मुलींची भेट घेणार आहेत. तसेच केसरकरांनी दोन्ही मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे. चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालावर बुधवारी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले, “एकत्र समिती स्थापन केली आहे. या समितीला महिला आयोगाच्या अध्यक्षा, बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा आणि पोलीस महानिरीक्षक मार्गदर्शन करतील.

हे ही वाचा >> मालवण: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण

आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी त्याला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.