Badlapur Sexual Assault Case Deepak Kesarkar : बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्या (वय चार वर्षे व सहा वर्षे) मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण अलीकडेच समोर आलं आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती गोळा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज (सोमवार, २६ ऑगस्ट) हा अहवाल वाचून दाखवला. केसरकर म्हणाले, “त्या मुलींची वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका व संस्थेतील पदाधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती असूनही त्यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही, तसेच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर पॉक्सो कायद्याच्या (लैंगिक गुन्ह्यांपासून लहान मुलांचं संरक्षण करणारा कायदा) कलम १९ व कलम २१ अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची शिफारस आम्ही केली आहे. पीडित मुलींच्या वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका, शाळेतील दोन सेविका व संस्थेतील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारसही आम्ही केली आहे”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा