Badlapur Sexual Assault : बदलापूरमधील एका प्रतिथयश शाळेतील दोन चिमुरड्यांवर त्यांच्याच शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे या सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार ( Badlapur Sexual Assault ) केल्याची घटना उघड झाली. १३ ऑगस्टला ही घटना घडली. त्यानंतर २० ऑगस्टला प्रचंड जनक्षोभ उसळला. आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर विशेष तपास समिती (SIT) स्थापन करण्यात आली होती. आता याच एसआयटीने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
१३ तारखेला घडली घटना
बदलापूरच्या प्रतिथयश शाळेत १३ ऑगस्टला लैंगिक अत्याचाराची ( Badlapur Sexual Assault ) घटना घडली. अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर १७ तारखेला त्याला अटक करण्यात आली. २० ऑगस्टला बदलापूरमध्ये जनक्षोभ उसळला होता. यावेळी या प्रकरणातल्या आरोपीला फाशी देण्याचीही मागणी झाली. तसंच मध्य रेल्वेची वाहतूक आंदोलकांनी ९ तास रोखून धरली. दरम्यान या प्रकरणी जी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या विशेष समितीने शाळेच्या दोन विश्वस्तांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
हे पण वाचा- Badlapur Sexual Assault: निलंबनाच्या कारवाईविरोधात ठाण्याचे शिक्षणाधिकारी उच्च न्यायालयात
काय म्हटलं आहे एसआयटीने?
एसआयटीने हे प्रकरण चौकशीसाठी हाती घेतलं आहे. दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण ( Badlapur Sexual Assault ) झालं आणि त्यांच्यावर अत्याचार झाले हे प्रकरण तपासताना आता एसआयटीने सांगितलं आहे की शाळेचे दोन विश्वस्त फरार झाले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस आणि सायबर पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत अशीही माहिती एसआयटीने दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन विश्वस्त लैंगिक अत्याचाराच्या ( Badlapur Sexual Assault ) चौकशीदरम्यान कुठलंही सहकार्य करायला तयार नव्हते. आता पोलीस जेव्हा या दोन विश्वस्तांच्या घरी गेले तेव्हा दोन्ही घरी नव्हते. या दोघांना एसआयटीने फरार घोषित केलं आहे. याआधी एसआयटीने आरोपीची ओळख परेड होईल असं म्हटलं होतं. मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत ही ओळख परेड होईल आणि पीडिता या प्रकरणातल्या आरोपीला ओळखतील असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचं सायकॉलॉजिकल प्रोफाईलही एसआयटीकडून तयार केलं जाणार आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेवर गुन्हा दाखल
२३ ऑगस्टला बदलापूर लैंगिक अत्याचार ( Badlapur Sexual Assault ) प्रकरणात शाळा प्रशासनाविरोधात एसआयटीने गुन्हा नोंदवला. पीडित मुलींच्या पालकांनी तक्रार करुनही शाळेने पोलिसात प्रकरण नेलं नाही. उलट हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. या आरोपावरुन एसआयटीने शाळेविरोधात गुन्हा दाखल केला. आता शाळेचे दोन विश्वस्त फरार झाले आहेत अशी माहिती विशेष तपास समितीने दिली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd