Badlapur Sexual Assault: बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार ( Badlapur Sexual Assault ) करण्यात आला. १३ ऑगस्टला घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी बदलापूरमध्ये २० ऑगस्टला प्रचंड जनक्षोभ उसळला होता. बदलापूरमध्ये रेल रोकोही करण्यात आला. या प्रकरणी आता पीडितेच्या पालकांनी शाळा आणि पोलिसांवर आरोप केला आहे.

नेमकी घटना काय घडली?

बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur sexual assault ) करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य (Badlapur sexual assault ) केलं. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती.

पीडितेच्या पालकांनी काय सांगितलं आहे?

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १३ ऑगस्टला सफाई कामगाराने दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार (Badlapur sexual assault ) केले. यातील एकीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तपासणीनंतर तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाल्याची बाब समोर आली. १६ ऑगस्ट रोजी पालक तो अहवाल घेऊन शाळेत गेले. मात्र शाळेने सायकलमुळे जखम झाली असावी किंवा शाळेबाहेर काही घडले असावे, असे निरर्थक दावे करत अहवाल फेटाळून लावला असं पालकांनी सांगितलं आहे. तसंच या प्रकरणात गंभीर आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे.

हे पण वाचा Badlapur Case : बदलापूर प्रकरणानंतर ‘शक्ती कायद्या’च्या मागणीला जोर, काय आहे मविआ सरकारने मांडलेलं विधेयक?

पालकांचा आरोप काय?

शाळा प्रशासनाने आम्ही दाखवलेला अहवाल फेटाळला. त्यानंतर आम्ही तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो. तिथे आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी १२ तास लावले. बदलापूर प्रकरणात मनसे नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आपल्या वक्तव्यात अनेक बदल केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, असा इशारा दिल्याचाही पालकांचा आरोप आहे. याच बरोबर आणखी एक आरोप पालकांनी केला आहे.

बदलापूर प्रकरणी कारवाई करण्यास पोलिसांचा विलंब (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

महिला पोलीसाने गुप्त बैठक घेतल्याचा आरोप

बदलापूरचं प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी एका महिला पोलिसाने शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. बदलापूरचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचं पीडित मुलीच्या पालकांनी म्हटलं आहे. आता ही महिला पोलीस अधिकारी कोण हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.