लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश के. डी. बोचे यांच्यासमोर जामीनावरील सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली होती. कायद्यासमोर सर्वजण समान असल्याचे निर्णय देताना न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
माळवी यांना मंगळवारीच मोरया इस्पितळातून हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या इस्पितळात हलविण्यात आले आहे. १६ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तृप्ती माळवी व त्यांचा स्वीय सहायक अश्विन गडकरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गडकरी यास अटक झाली होती. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली होती. गुन्हा दाखल झालेल्या दिवशी रात्र असल्यामुळे माळवी यांना तांत्रिक कारणामुळे अटक केली नव्हती. तथापि त्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढला. दुस-या दिवशी त्यांना मोरया इस्पितळात दाखल करण्यात आले. पक्षाच्या पदाधिका-यांनी इस्पितळात भेट घेऊन माळवी यांचा महापौरपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर माळवी यांचे अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरू राहिले. सोमवारी त्यांच्या वतीने अॅडव्होकेट प्रशांत देसाई यांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मागितला होता. त्यांचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा